Ads

शेतकरी आक्रमक, शेताला पाणी द्या ! अन्यथा शिवाजी चौकात आंदोलन

( प्रशांत गेडाम)सिंदेवाही-घोडाझरी धारणाअंतर्गत गडबोरी वितरीकेच्या टेलवरील गावांना अखंडित पाणीपुरवठा सुरळीत चालू करू असा समजोता 19आक्टोंबरला सिंदेवाही तहसीलदारांनी शेतकऱ्यांना आपल्या दालनात बोलवून तहसीलदार व घोडाझरी उपविभागीय अधिकारी यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांना सांगण्यात आले आंदोलन मागे घ्या अंतिम टोकावरील गावांना शेती करता अखंडित पाणीपुरवठा करू असे सांगण्यात आले होते. दोन दिवस शेतकऱ्यांना शेताला पाणी पुरवण्यात आले आणि नंतर तिसऱ्या दिवशी पुन्हा तेच पाणी बंद करण्यात आले‌. असे दिसुन येताच संतप्त झालेल्या शेतकऱ्याने आता आक्रमक पवित्रा घेत.
Aggressive farmers, water the fields! Otherwise protest at Shivaji Chowk
शेतकऱ्यात लोकप्रतिनिधी व प्रशासना विरुद्ध असंतोष निर्माण झालेला आहे. योग्यवेळेस शेतातील धान पिकाला पाणी न मिळाल्यास हजारो हेक्टर मधील धानपिक करपण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी शेतकऱ्यापुढे आत्महत्येशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. म्हणून तत्पूर्वी अंतिम टोकावरील गावांना शेतीकरिता अखंडित पाणीपुरवठा न झाल्यास वानेरी, रामाळा, गडबोरी, मिनघरी, नाचनभट्टी, उमरवाही व अंतरगाव इत्यादी गावातील शेतकऱ्यांनी घोडाझरी विभाग सिंदेवाही कार्यालयाला घेराव घालून शिवाजी चौक सिंन्देवाही येथे "रास्ता रोको आंदोलन" "Rasta Roko Movement" करण्यात येणार आहे.
असे निवेदन शेतकऱ्यांनी सिंदेवाही तहसीलदारांना दिले आहे.निवेदन देतांना गडबोरी टेलवरील शेतकरी मुरलीधर काशिनाथ मडावी ,अजय गुरु ,प्रभाकर रणदिवे,चंदू कंदलवार, केशव नागोसे,हर्षद बोरकर ,गजानन कुर्नावार,प्रशांत गेडाम
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment