Ads

दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भद्रावती शहरातील पैदलवारी ..

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:-भद्रावती समितीतर्फे नवरात्री पर्वाच्या निमित्याने शहरातील प्राचीन भवानी मंदिरापासून ते चंद्रपूर येथील सुप्रसिद्ध महाकाली मंदिरापर्यंत पैदल वारी काढण्यात आली.
Like every year, this year too, walk in Bhadravati city
या पैदलवारीमध्ये शहरातील जवळपास 400 भाविकांनी भाग घेऊन चंद्रपूर येथील माता महाकालीचे दर्शन घेतले. सदर पैदलवारी दिनांक 21 रोज शनिवारला रात्रो साडेनऊ वाजता भवानी मंदिरातून निघाली ती दिनांक 22 रोज रविवारला पहाटे चंद्रपूर येथील सुप्रसिद्ध महाकाली मंदिरात पोहोचली. सदर वारीत भवानी मातेची पालखी तथा रथ सहभागी करण्यात आला होता. सदर वारी महाकाली मंदिरात पोहोचल्यानंतर मंदिर परिसरात पैदलवारीचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर वारीतील भाविकांनी माता महाकालीचे दर्शन घेतले. त्यानंतर पैदल वारीची सांगता करण्यात आली. गेल्या कित्येक वर्षांपासून भद्रावती शहरात या पैदलवारीची परंपरा कायम आहे. या वारीत भाविक जवळपास 35 किलोमीटरचे अंतर पैदल कापून चंद्रपूर येथील माता महाकालीच्या दर्शनासाठी जात असतात. सदर वारीत भाजपचे शहर महामंत्री प्रशांत डाखरे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष अमित गुंडावार, रितेश उपलंचीवार, यश महाले, प्रशांत वेलफुलवार,विशाल ठेंगणे, स्वप्निल बिंजवे, युवराज बावणे, प्रदीप लोणकर, अमोल कंडे, योगेश मत्ते, गोपाल गोसवाडे, गोपाल गौरकार, दीपक पारधे, विवेक आकोजवार, सुनील महाले, राकेश तिवारी, संतोष नेहारे आदींसह शहरातील भाविक सहभागी झाले होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment