(प्रशांत गेडाम)तळोधी (बा.) - बोकडडोह नाल्यातून रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर वाढोणा परिसरात पोलिसांनी जप्त केला. तळोधी बा. पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी वाढोणा परिसरातील गावात रात्रीच्या सुमारास गस्त घालत असताना रेती भरलेला ट्रॅक्टर (एमएच ३४ बीजी ०६९८) आढळून आला. पोलिसांनी ट्रॅक्टर अडवून तपासणी केली असता चालकाकडे कुठल्याही प्रकारचा रेती परवाना नसल्याचे दिसून आले. The police caught the tractor that was illegally transporting sand
पोलिसांनी अवैध रेती व ट्रॅक्टर असा ३ लाख ४० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपी संजय चुन्नीराम गहाने (४६) याच्याविरुद्ध कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास तळोधी बा. पोलिस ठाण्याचे ठाणेदार मंगेश भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नाकर देहारे करीत आहे.
About
The Chandrapur Times
यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।
0 comments:
Post a Comment