चंद्रपूर-येथील दलीतमित्र, आदिवासी सेवक तथा पत्रकार डी.के.आरिकर यांचा वाढदिवस आश्रय कॉलनी गुरुद्वारा जवळ तुकुम चंद्रपूर येथील ओपन स्पेस वर वृक्षारोपण करून तसेच समाजासाठी कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा सत्कार करून साजरा करण्यात आला.Plantation of trees on the occasion of D.K.Arikar's birthday, social workers felicitated
कार्यक्रमाला जेष्ठ समाजसेवक हिराचंद बोरकुटे, नाट्य कलावंत अनिरुद्ध वनकर, विजय बलकी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी सातत्याने सामाजिक कार्यात आपले योगदान देणारे प्रदीप अडकीने, ऍड वैशाली टोंगे, राजेश भानोसे, प्रमोद कोरडे, माणुसकी ग्रुप चंद्रपूर, विजय बलकी, अनिरुद्ध वनकर, शिल्पा कांबळे, यांचा स्मृतिचिन्ह पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तेव्हा डी. के. आरीकर यांच्या सोबत कल्पना आरीकर यांचाही वाढदिवस साजरा करून त्यांचाही सन्मान चिन्ह व पुस्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.माणुसकी ग्रुपच्या कार्याचं कौतुक करून त्यांचा सुद्धा सन्मान चिन्ह व पुस्पगुछ आणि काही आर्थिक मदत सुद्धा डी. के. आरीकर यांनी केली.
कार्यक्रमाला शहरातील पर्यावरण प्रेमी पांडुरंग गांवतुरे, प्रा. माधव गुरनुले, अरुण धानोरकर, मनोज जुनोणकर, डॉ. देव विजय केशव मेश्राम, हरीश साहनी, नामदेवराव लढी,पौर्णिमा मेहरकुरे,रोहनकर, विद्या चिताडे, सीमा वनकर वर्षा कोठेकर, राणी राव, शिंदे मॅडम कन्नाके, विलास गौरकर, बापूराव पारखी,नितीन भटारकर सुजित उपरे, शिरीष बागडे, राजू जिल्हेवार, जस्मिन शेख, स्वेता जिल्हेवार सपकाळ साहेब, एच. एम. भोवते, एच. बी. पटले वैशाली रोहनकर पी. एस. आरीकर, विलास कोळसे, राजू कक्कड, सुनील काळे, बब्बूभाई, भोलू काछेला रंजना नागतोडे गुलाबराव पाटील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. यशस्वीतेसाठी हरीश ससनकर, प्रा.विजय रोहनकर,मनोहर जाधव, अमृतलाल राठी, सुषमा लीडर यांनी प्रयत्न केले.
0 comments:
Post a Comment