Ads

हॉटेल ताडोबा अतिथी इन लोहारा येथे कुंटणखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धाड – १ पीडित महिलेची सुटका

चंद्रपूर, दि. 1 नोव्हेंबर (प्रतिनिधी):
स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी हॉटेल ताडोबा अतिथी इन, लोहारा येथे चालविण्यात येत असलेल्या कुंटणखान्यावर कारवाई करत एक पीडित महिलेची सुटका केली आहे. या कारवाईत लकी उर्फ लक्ष्मण रामसिंह शर्मा (वय 26, रा. अलवर, राजस्थान) या मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.
Local Crime Branch raids a brothel at Hotel Tadoba Guest Inn Lohara – 1 victim rescued
दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, हॉटेल ताडोबा अतिथी इन, लोहारा येथे लकी नावाचा इसम स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांकडून वेश्याव्यवसाय करवून घेत आहे. खात्रीशीर माहितीनुसार पथकाने तातडीने छापा टाकला असता आरोपी लकी शर्मा हा हॉटेलमध्ये पीडित महिलेला आर्थिक लाभाकरिता वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करत असल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी पोलीस स्टेशन रामनगर येथे कलम 3, 4, 5, 7 अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम (PITA) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस अधिकारी अमोल काचोरे (पोलीस निरीक्षक), पो.उ.नि. संतोष निंभोरकर, पो.उ.नि. सुनील गौरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

पथकात स.फो. धनराज कारकाडे, पो.हवा. सुरेंद्र महतो, दीपक डोंगरे, पो.अ. प्रफुल गारघाटे, सुमित बरडे, शशांक बादमवार, किशोर वाकाटे, हिरालाल गुप्ता, चालक मिलिंद टेकाम तसेच महिला पोलिस छाया निकोडे, अपर्णा मानकर, उषा लेडांगे, निराशा तीतरे, सर्व स्थानिक गुन्हे शाखा / AHTU चंद्रपूर तसेच समाजसेविका सरिता मालू, रेखा भारसकडे (NGO चंद्रपूर) यांचा सहभाग होता.

पोलीस विभागाने लॉजिंग आणि हॉटेल व्यवसायिकांना इशारा दिला आहे की, अशा प्रकारे अवैध कुंटणखाने चालविणाऱ्या विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment