वरोरा :
वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार करणदादा देवतळे यांच्या प्रभावी आणि जनसंपर्कप्रधान नेतृत्वावर विश्वास ठेवून मालवीय प्रभाग क्रमांक एक, वरोरा येथील विकास परचाके आणि अर्चना विकास परचाके यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
“Faith in MLA Karandada’s leadership — Vikas Parchake couple joins BJP!”
या प्रवेशप्रसंगी वरोरा शहर भाजपा अध्यक्ष संतोष पवार आणि भद्रावती ग्रामीण अध्यक्ष श्यामभाऊ उरकडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
या वेळी शहराध्यक्ष संतोष पवार म्हणाले, “आमदार करणदादा देवतळे यांच्या कार्यशैलीमुळे आणि लोकाभिमुख नेतृत्वामुळे नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे नवे पर्व सुरू झाले असून अनेक नागरिक स्वेच्छेने भाजपात प्रवेश करत आहेत.”
त्यांनी पुढे सांगितले की, भविष्यात आणखी अनेक नागरिक आमदार साहेबांच्या कार्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत सहभागी होतील.
भाजपाचे वाढते जनाधार आणि आमदार करणदादा देवतळे यांचे सक्षम नेतृत्व वरोरा शहरात नव्या ऊर्जेचा संचार करत असून पक्षसंघटन अधिक बळकट होत आहे
0 comments:
Post a Comment