Ads

हिवरा फाटा येथे नाकेबंदी; 10 गोवंशीय जनावरे कत्तलीपासून वाचवली, 8 लाखांचा मुद्देमाल जप्त

धाबा (दि. 03/02/2026) : उप पोलीस स्टेशन धाबा येथे आज पोलीस स्टेशन पोंभूर्णा कडून मिळालेल्या माहितीनुसार पोंभूर्णा हद्दीतून एका वाहनातून गोवंशीय जनावरांची अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे समजले. संबंधित वाहनाचा पाठलाग सुरू असल्याची माहिती मिळताच ते वाहन विढढलवाडा मार्गे तेलंगणा राज्यात जात असल्याने धाबा पोलिसांनी तातडीने हालचाल केली.
Blockade at Hiwara Phata; 10 cattle saved from slaughter, valuables worth Rs 8 lakh seized
ठाणेदार धमेन्द्र मडावी यांच्या नेतृत्वाखाली पोहवा विजय मडावी, श्रावण कुत्तरमारे, अमोल कुळमेथे, चंद्रशेखर आसुडकर यांनी हिवरा फाटा येथे नाकेबंदी करून संशयित वाहन ताब्यात घेतले. पंचांसमक्ष झडती घेतली असता वाहनामध्ये 10 गोवंशीय जनावरे आढळून आली. एक चारचाकी वाहनासह एकूण 8,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, वाहनाचा चालक वाहन सोडून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. या कारवाईत 10 गोवंशीय जनावरांना कत्तलीपासून वाचविण्यात पोलिसांना यश आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री इश्वर कातकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधीर नंदनवार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री आमले (उपविभाग मूल) यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रभारी अधिकारी सपोनि धमेन्द्र मडावी यांच्या उपस्थितीत पार पडली. यामध्ये उप पो. स्टे. धाबा व पो. स्टे. पोंभूर्णा येथील सपोनि राहुल ठेंगणे, अरविंद चौधरी, रजत रामटेके आदींनी सहभाग घेतला.
प्रकरणाचा पुढील तपास उप पोलीस स्टेशन धाबा करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment