चंद्रपुर :-पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथील श्री. मुकुंद सुरेश भुरसे यांना तोंडाच्या कर्करोगाचे निदान झाल्याची धक्कादायक बातमी समजताच भुरसे कुटुंबावर जणू आकाश कोसळले. आधीच हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या कुटुंबासाठी उपचारांचा प्रचंड खर्च परवडणारा नव्हता. निराशा, भीती आणि असहायता अशा भावनांनी कुटुंब वेढले गेले होते.
MLA Sudhir Mungantiwar became an angel in a crisis; He gave a new life to a family battling cancer
अशा अंधारलेल्या आणि कठीण क्षणी आ. सुधीर मुनगंटीवार देवदूतासारखे धावून आले. परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत त्यांनी कोणताही विलंब न करता मुंबईतील नामांकित हिंदुजा रुग्णालयात आवश्यक शस्त्रक्रियेची तसेच जेवण व राहण्याची संपूर्ण व्यवस्था करून दिली. धर्मदाय योजनेच्या माध्यमातून तब्बल ५ लाख ५० हजार रुपयांचा खर्च मोफत करून देण्यात आला, तर पुढील रेडिएशन थेरपीसाठी अतिरिक्त ३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यामुळे पुढील उपचारांचा मार्गही सुलभ झाला.
मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आणि मृत्यूशी झुंज देणाऱ्या मुकुंद भुरसे यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आशेचा किरण उजळला. केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर “तुम्ही एकटे नाही” हा मायेचा आणि धीर देणारा संदेश देत आ. मुनगंटीवार यांनी कुटुंबाला मानसिक आधार दिला.
संकटात माणुसकी जपणाऱ्या आणि तत्परतेने मदतीचा हात पुढे करणाऱ्या या कार्यामुळे एका कुटुंबाला नवजीवन लाभले. डोळ्यांत अश्रू आणि मनात अपार कृतज्ञता ठेवत भुरसे कुटुंबाने आ. सुधीर मुनगंटीवार यांचे मनापासून आभार व्यक्त केले.
0 comments:
Post a Comment