Ads

राखीव वनात रेती माफियांचा धुमाकूळ; दोन ट्रॅक्टरसह मोठी कारवाई

 भद्रावती प्रतिनिधी जावेद शेख :-
दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी सुमारे 8.30 वाजताच्या सुमारास भद्रावती वनपरिक्षेत्रातील मासळ व पावना नियतक्षेत्रात अवैधरित्या रेती उत्खनन व वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती संयुक्त वनव्यवस्थापन समिती पेवरा सदस्यांनी वनरक्षक पावना यांना दिली.illegal sand SmugglingSand mafia busted in reserved forest; Major operation with two tractors
 राजन तलमले, विभागीय वन अधिकारी चंद्रपूर व मा. विकास तरसे, सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू) यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. के. डब्ल्यू. धानकुटे यांच्या नेतृत्वात पथकाने राखीव वन कक्ष क्रमांक 219 (मासळ) व कक्ष क्रमांक 9 (पावना) येथे धाड टाकली.
कारवाईदरम्यान महिंद्रा 475 DI ट्रॅक्टर (क्र. MH-34-L-8999, लाल रंग) व क्रमांक नसलेली ट्रॉली तसेच सोनालीका ट्रॅक्टर (निळा रंग) व क्रमांक नसलेली ट्रॉली नाल्यातून अवैधरित्या रेती उत्खनन करून वाहतूक करताना आढळून आले. चालकांकडे कोणतीही वैध परवानगी किंवा कागदपत्रे नसल्याने दोन्ही ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करण्यात आले असून वाहनमालकांविरुद्ध वनगुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर मोहिमेत क्षेत्र सहाय्यक व वनरक्षकांनी सक्रिय सहभाग घेत कारवाई यशस्वी केली. अवैध रेती उत्खनन रोखण्यासाठी वनविभागाकडून पुढेही अशाच धडक मोहिमा राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment