Ads

"लेखिका आपल्या दारी" उपक्रमा अंतर्गत डॉ. नीलिमा गुंडी यांची इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांशी आभासी पद्धतीने हितगुज.

राजुरा २ फेब्रुवारी :-
          महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघ, राजुरा व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने "लेखिका आपल्या दारी" हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
Dr. Neelima Gundi interacts with class 10th students virtually under the "Lekhika Aapa Dari" initiative.
 राजुरा येथील सुप्रसिद्ध वेक्टर मॅथ क्लासेस याठिकाणी शहरातील आदर्श हायस्कूल, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, शिवाजी हायस्कूल येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी या आभासी पद्धतीने झालेल्या हितगुज व मराठी विषयातील "बोलतो मराठी"  या पाठावर संवाद साधला. रजनी शर्मा, मार्गदर्शक तथा नागपूर विभाग महिला अध्यक्षा, राष्ट्रीय कला साहित्य व सांस्कृतिक विकास समिती यांच्या मार्गदर्शनाखाली व बादल बेले, कार्यवाह तथा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था  यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. डॉ. नीलिमा गुंडी या पुणे येथे राहत असून त्या बोलतो मराठी या पाठाच्या लेखिका आहेत. मराठी भाषा विषयाच्या प्राध्यापिका , भाषातज्ञ आणि लेखिका म्हणून त्या सुपरीचीत आहे. मराठी भाषेतील विविध शब्दप्रयोगांमुळे विनोदाची निर्मिती कशी होते, याचे वर्णन प्रस्तुत पाठात आले आहे. व्युत्पत्ती कोशात शब्दांची व्युत्पत्ती शोधल्याने आपल्याला खूप नवीन माहिती कळते, आनंदही मिळतो. आपल्या जीवनात भाषेला महत्त्व दिल्यास , मनातल्या भावभावनांचे सूक्ष्म अर्थसौंदर्य उलगडण्यास मदत होते, याविषयी पाठाच्या आधारे माहिती, स्पष्टीकरण लेखिका डॉ. नीलिमा गुंडी यांनी केले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्न विचारून शंकांचे निराकरण केले. या आभासी पद्धतीने झालेल्या हितगुज व संवाद करीता वेक्टर मॅथ क्लासेस चे संचालक मुनीब शेख, स्वप्नील पहाणपटे, मयूर इटनकर यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बादल बेले यांनी मानले. यावेळी आदर्श शाळेतील शिक्षिका आशा बोबडे, शिवाजी हायस्कूल चे विजय उमरे,आशिष नलगे, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय चे मोहनदास मेश्राम आदींची उपस्थिती होती.
--------------------------------------------
         परिचय लेखिकेचा....
डॉ. नीलिमा गुंडी, लेखिका, पुणे
        त्यांची 'अक्षरांचा देव', 'निरागस' हे बालसाहित्य; 'देठ जगण्याचा', 'रंगांचा थवा ' हे ललित लेखसंग्रह; 'भाषाप्रकाश', 'भाषाभान', 'शब्दांची पहाट' हे भाषाविषयक लेखसंग्रह इत्यादी ३५ पुस्तके प्रकाशित आहेत. २०११ साली बेळगाव येथे झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेकडून प्रसिद्ध होणाऱ्या ' संवेदना' या २०११ आणि २०१२ सालच्या दिवाळी अंकांसाठी मुख्य संपादक म्हणून त्यांनी काम केले आहे. इयत्ता दहावी मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकात पाठ २. बोलतो मराठी या पाठाच्या त्या लेखिका आहे. विद्यार्थ्यांशी हितगुज, संवाद साधून त्यांनी आनंद व्यक्त केला. व विद्यार्थ्यांना भयमुक्त, तणावमुक्त, कॉपीमुक्त परिक्षेकरीता शुभेच्छा दिल्या.
--------------------------------------------
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment