भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:-शहरालगत असलेल्या बरांज येथील कर्नाटका एम्टा खाणीत कंपनीच्या आधीनस्थ काम करणाऱ्या ठेकेदारी कंपनीत काम करीत असलेल्या मजुरांचे शोषण होत असून त्यांच्या अनेक समस्या आहेत.या समस्यांचे त्वरित निराकरण करण्यात यावे यासाठी माजी नगरसेवक तथा भाजपचे शहर महामंत्री प्रशांत डाखरे यांच्या नेतृत्वात कामगारांच्या अनेक मागण्यांचे निवेदन येथील तहसील कार्यालयामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे.
या समस्या पंधरा दिवसात निकालात न काढल्यास भाजप तर्फे कंपनी विरोधात तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा सनी पॉईंट येथे घेण्यात आलेल्या एका पत्र परिषदेतून महामंत्री प्रशांत डाखरे यांनी दिला आहे. यावेळी कामगारांना भीक नको त्यांना त्यांचा हक्क द्या असे प्रशांत डाखरे यांनी ठणकावून सांगितले. कंपनीतील सर्व कामगारांना नियमानुसार वेतन देण्यात यावे, कंपनीत काम करणाऱ्या कामगारांचे कंपनीकडून नियमित ईपीएफ भरल्या जात नाही ते नियमित भरण्यात यावे, खाणीत काम करणाऱ्या कामगारांचा व त्यांच्या कुटुंबाचा विमा काढण्यात यावा, खाणीत काम करणाऱ्या कामगारांना बोनस व वेतनासह नियमानुसार विविध प्रकारची रजा मंजूर करण्यात यावी, कंपनीत काम करणाऱ्या प्रत्येक कामगारांचा 50 लक्ष रुपयांचा विमा काढावा व त्याची मासिक रक्कम कंपनीतर्फे भरल्या जावी, खाणीत काम करताना कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती उपकरणे कंपनीकडून उपलब्ध करून देण्यात यावी,कामगारांना दुपारच्या सुट्टीत खाण परिसरात आराम करण्यासाठी रेस्ट हाऊस उपलब्ध करून द्यावे, कामगारांसाठी खाण परिसरात कंपनीतर्फे अल्प दरात उपहारगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी,खाण परिसरात कामगारांना पिण्याचे शुध्द व थंड पाणी ऊपलब्ध करुन द्यावे,राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे कंपणीत 80 टक्के स्थानिक नागरिकांना व प्रकल्पग्रस्तांना रोजगार ऊपलब्ध करुन द्यावा, बरांज,किलोणी, तांडा, मानोरा,कोंढा या परिसरातील जमिनी कंपणीतर्फे घेण्यात आल्या मात्र जमिनीचे अवार्ड अद्याप पर्यंत जाहिर करण्यात आलेले नाहीत ते अवार्ड त्वरित जाहिर करावे अशा मागण्या निवेदनाव्दारे शासनासमोर ठेवण्यात आल्या आहेत.पत्रपरिषदेला शहर महामंत्री प्रशांत डाखरे, माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवार, नाना हजारे,रामाजी मत्ते, रवी डोंगे,राजु मत्ते आदी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment