Ads

प्रशासनाचा दुर्लक्षपणामुळे युवकाचा मृत्यू,

चंद्रपूर, २५ ऑक्टोबर- चंद्रपूर शहरातील सोनामाता मंदिराजवळील प्राचीन कालीन विहिरीत २४ ऑक्टोबर रोजी रात्री नऊच्या सुमारास एका तरुणाचा मृत्यू झाला. तोल गेल्याने विहिरीत पडलेल्या या तरुणाचे नाव आकाश पाल (२६) असे आहे.Death of youth due to negligence of administration,
या घटनेची माहिती मिळताच आम आदमी पार्टीचे युवा जिल्हा अध्यक्ष राजु कुडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापनाला घटनास्थळी बोलावले. तसेच, वॉर्डातील युवकांनाही मदत करण्यास सांगितले.

पोलीस आणि महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने वॉर्डातील युवकांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढला.

आकाश पाल हा डॉ. आंबेडकर नगरमधील माता चौक येथे राहणारा होता. तो एक गरीब कुटुंबातील कमावता तरुण होता. त्याच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेवर आम आदमी पार्टीचे युवा जिल्हा अध्यक्ष राजु कुडे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी महानगरपालिकेला विहिरीवर सुरक्षा जाळी बसवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment