चंद्रपुर :-आज पहाटे पाच वाजता कोरपना तालुक्यातील उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कंपनीच्या बाजूला असलेल्या मोबाईल टॉवरवर चढलेले प्रकल्पग्रस्त संध्याकाळ पर्यंत खाली उतरले नाही.अदानी समूहाच्या अंबुजा सिमेंट कंपनीचे भूमी अधिग्रहण रद्द करण्यात यावे किंवा प्रकल्पग्रस्तांना नोकरी द्यावी ही आंदोलन करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे.The discussion fizzled out.. Ambuja towered over the project till evening
प्रकल्पग्रस्त टाॅवर वर चढल्याची माहिती मिळताच जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी गडचांदूरला धाव घेतली. आंदोलनाच्या ठिकाणी गडचंदूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, तहसीलदार वाकडकर हे दिवसभर ठाण मांडून बसले होते. दुपारी 3 दरम्यान अंबुजा सिमेंट कंपनी च्या कार्यालयात प्रकल्पग्रस्त व अंबुजा सिमेंट कंपनीचे व्यवस्थापक यांच्यात चर्चा झाली.दीड तास चाललेल्या चर्चेत पोलीस निरीक्षक शिंदे व तहसीलदार वाकडकर यांनी चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.याबाबत प्रकल्पग्रस्तांशी संपर्क साधून त्यांना माहिती देण्यात आली. परंतु जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत टॉवरच्या खाली उतरणार नाही अशी भूमिका आकाश लोडे, सचिन पिंपळशेंडे, अविनाश विधाते तुषार निखाडे संदीप वरारकर व संजय मोरे यांनी घेतली. संध्याकाळी अंदाज होईपर्यंत आंदोलन सुरू होते.
0 comments:
Post a Comment