Ads

पंचायत समिती सिंदेवाही घरकुल विभागाचे अभियंता मनोज देशमुख तडकाफडकी निलंबित

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही - जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत पंचायत समिती सिंदेवाही येथे घरकुल विभागात ग्रामीण गृहनिर्माण अभियंता म्हणून मनोज देशमुख हे मागील अनेक दिवसापासून कार्यरत असताना प्रकल्प कार्यालयाला त्यांच्या तक्रारी प्राप्त होताच, प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा कार्यालय चंद्रपूर यांनी त्यांना तडकाफडकी निलंबित केले असल्याचे पत्र पंचायत समितीला प्राप्त झाले आहे.Panchayat Samiti Sindewahi Gharkul Division Engineer Manoj Deshmukh suspended
ग्रामीण भागातील घरकुल योजनेचे तांत्रिक पर्यवेक्षण , नियंत्रण, आणि मार्गदर्शन करण्याची जबाबदारी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता म्हणून पंचायत समिती मधील घरकुल विभागात इंजिनियर ची नियुक्त करण्यात येते. यानुसार सिंदेवाही पंचायत मध्ये मनोज देशमुख आणि स्वप्नील कायरकर, हे दोन व्यक्ती कार्यरत होते. यापैकी मनोज देशमुख हे सतत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना आर्थिक त्रास देण्याचे काम करीत होते. त्यामुळे नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत विरोधी पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी अभियंता मनोज देशमुख यांची कानउघडणी केली होती. त्यानुसार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय चे प्रकल्प संचालक डॉ.सुभाष पवार यांनी अभियंता मनोज देशमुख यांना तडकाफडकी निलंबित केले असून याबाबतचे पत्र पंचायत समिती कार्यालय सिंदेवाही येथे प्राप्त झाले आहे. त्यामुळे कोणत्याही घरकुलच्या लाभार्थ्यांनी इंजिनियर मनोज देशमुख यांचे सोबत संपर्क करू नये.
अभिप्राय
वरिष्ठ स्तरावरून कारवाही झाल्याचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे पंचायत समिती कार्यालय कडून देशमुख यांना कळविण्यात आले आहे.
अक्षय सुक्रे
गट विकास अधिकारी
पंचायत समिती सिंदेवाही.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment