Ads

सिंदेवाहीला चे नवे तहसीलदार संदीप जी. पानमंद झाले रूजू

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही - सिंदेवाही तालुक्याला मागील सहा महिन्यापासून स्थायी तहसीलदार मिळत नसताना अखेर स्थायी तहसीलदार म्हणून संदीप जी पानमंद नव्याने रुजू झाले आहेत.The new tehsildar of Sindewahila Sandeep G.Panmand Join
सिंदेवाही तहसिल कार्यालयातील मागील तहसीलदार जगदाळे यांचे बदली नंतर आता पर्यंत चार तहसीलदार या तालुक्याला मिळाले आहेत. मात्र कोणतेही तहसीलदार स्थायी नसल्याने या तालुक्यातील अनेक प्रकरणे थंड बस्त्यात पडलेले आहेत. आता नव्याने स्थायी तहसीलदार म्हणून रुजू झालेले संदीप पानमंद यांचा कार्यकाळ जास्तीत जास्त राहणार असून रुजू झालेले तहसीलदार संदीप जी पानमंद हे स्थायी तहसीलदार म्हणून मिळाल्याने सिंदेवाही नायब तहसिलदार- तुमराम,अधिकारी - लोखंडे , महसूल विभागाचे मंडळ अधिकारी,तलाठी,सिंदेवाही तहसिल कार्यालयातील कर्मचारी यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सिंदेवाही महसूल विभागाचे मंडळ अधिकारी चिडे, तोडसाम,गेडाम, परचाके व सिंदेवाही तालुक्यातील तलाठी झाडे,नागपुरे ,आकरे, फुलझेले , अहिरकर,कन्नाके,श्रीरामे, इत्यादी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment