जावेद शेख तालुका प्रतिनिधी भद्रावती :-जि.प.शाळा ह्याच वर्तमान व भविष्यातील आव्हाणे पेलविणारे शिक्षण देणा-या शाळा आहेत व त्या गावागावात कायम असल्याच पाहिजेत,त्या वाचविण्यासाठी नागरीकांनी पुढे यावे असे आवाहन भद्रावती सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा सरपंच नयन जांभुळे यांनी पालक- शिक्षक- विद्यार्थी सभेला संबोधीत करतांना केले.
स्थानिक जि.प.उ.प्रा.शाळा,चंदनखेडा येथे पालक शिक्षक-विद्यार्थी संवाद सभेचे आयोजन केले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल कोकुडे शा.व्य.स. तर उद्घाटक तथा मार्गदर्शक म्हणुन मा.डाँ.प्रकाश महाकाळकर ग.शि.अ.तसेच मा.सौ.भारती उरकांदे उपसरपंच,मा.अनिता आईंचवार मु.अ.यासह सर्व सदस्य शा.व्य.समिती मंचावर विराजित होती.
याप्रसंगी बालकांच्या उपजत कलांना प्राधान्याने पुढे आणण्यासाठी कार्यानुभवाची विविध दालनांची प्रदर्शनी भरविली होती.काष्टकला,भेटकार्ड आकाश कंदिल,स्वनिर्मित रंगीत रांगोळी,स्प्रे पेंटींग,स्वनिर्मित मातीची सुबक दिवे यासह विद्याथ्यांचे संवादाचे आयोजन करण्यात आले होते.पालक व मान्यवर पाहुण्यांनी बालकलेला प्रोत्साहन देण्याच्या शिक्षकांच्या प्रयत्नांचे भरभरुन कौतुक केले.शाळेचा शैक्षणिक, सामाजीक,भौतिक या विकासात्मक विद्यार्थी गुणात्मक विकास याच तिहेरी संवादातून होत असतो असे मत डाँ.प्रकाश महाकाळकर यांनी उद्बोद्धीत केले.नंतर "पालक शिक्षक विद्यार्थी प्रत्यक्ष संवाद" घेण्यात आला.अनेक पालकांनी आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक समस्या,अडचणी मांडल्या यावर मुक्त संवाद साधला गेला,यावेळी मंचावर उपस्थित मान्यवरांनी आपापल्या मनोगतातून आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा दिवसेंदिवस होत असलेला गुणात्मक विकास,वाढलेला सर्वांगीण दर्जा याबद्दल सर्वच शिक्षकांच्या कार्यावर समाधान वदले.प्रश्न उपप्रश्न करुन प्रत्येक शिक्षकांनी समाधानकारक निराकरण केले,पालकांच्या सुचनांचा स्विकार केला. याबाबत गौरवोद्गारही काढले.मागील काही काळापासून शाळेचा वाढत असलेला शैक्षणिक व गुणात्मक प्रगतीचा आलेख यावर मान्यवरांनी सर्व शिक्षकांचे कौतुक केले.
मु.अ.अनिता आईंचवार यांनी शाळेने केलेल्या शैक्षणिक नियोजन याबाबत प्रास्ताविकातून मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन विद्यार्थीनी कु.भार्गवी नगराळे,वेदिका निखार यांनी संयुक्तपणे केले तर आभार कु.साफिया पठाण हिने केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक श्री गायकवाड,श्री बोढे,श्रीलोंढे,श्री,कुंभारे,कु.धकाते,सौ.गुंडमवार,श्री.मेश्राम यांनी अथक परिश्रम घेतले.
0 comments:
Post a Comment