Ads

चंद्रपुरात 25 वी युथ राज्यस्तरीय अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेचे शुभारंभ 25th Youth State Level Championship Volleyball Tournament kicks off at Chandrapur

चंद्रपूर :- मथुरा स्पोर्टिंग क्लब चंद्रपूर तर्फे शहरात 25 वी युथ राज्यस्तरीय अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन 24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलेले आहे.
25th Youth State Level Championship Volleyball Tournament kicks off at Chandrapur
चंद्रपूर शहरातील रवींद्रनाथ टागोर शाळेचे मैदान, विठ्ठल मंदिर वार्ड येथे करण्यात आले आहे, आजपासून सुरू होणाऱ्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षपद आमदार सुभाष धोटे तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रतिभा धानोरकर, कांग्रेस शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, विजय डांगरे, उपाध्यक्ष भारतीय व्हॉलीबॉल महासंध अध्यक्ष महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटना, संजय नाईक, सहसचिव, भारतीय महासंघ तथा सचिव महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटना सचिव 
पुरुषोत्तमजी पंत, चेअरमन, महाराष्ट्र हॉलीवॉल रेफरी बोर्ड, धनंजय शास्त्रकार, उद्योजक प्रमोद आवते, अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन राजीव चौधरी, उपाध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन सुनिल आखाडे, सचिव, चंद्रपूर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनआदि उपस्थित राहणार आहे.

24 नोव्हेम्बरला व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन झाल्यावर रविवार 26 नोव्हेम्बरला आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे.

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी झाले असून यामध्ये (मुले व मुली) नागपूर विभाग, मुंबई, लातूर, अमरावती, छत्रपती संभाजी नगर, पुणे, कोल्हापूर व नाशिक विभागातील संघाचा समावेश आहे.

आयोजित कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन मथुरा बहुद्देशीय संस्था व मथुरा स्पोर्टिंग क्लबचे अभय बद्दलवार व प्रकाश मस्के सह सदस्यांनी केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment