Ads

जिवनात खिलाडुवृत्ती जोपासणे गरजेचे:शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे.

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख :-जिवनामधे यशस्वी होण्यासाठी खिलाडूवृत्ती असने गरजेचे असते.हि खिलाडूवृत्ती विवीध खेळांच्या माध्यमातून विकसित होत असते.त्याचप्रमाणे खेळामुळे शरीर व मन दोन्ही प्रसन्न राहुन निरामय आरोग्य मिळते.त्यामुळे प्रत्येकाने जमेल त्या खेळात भाग घेऊन खिलाडूवृत्ती जोपासावी व आपले आरोग्य सुदृढ ठेवावे असे आवाहन शिवसेना ऊबाठा गटाचे जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी केले.
It is necessary to cultivate sportsmanship in life: Shiv Sena District Chief Mukesh Jivatode.
आदर्श विद्यार्थी व्यायाम शाळा,चोरा यांच्या सौजण्याने तालुक्यातील चोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानावर तालुकास्तरीय पुरुषांच्या कबड्डी स्पर्धेचे मोठ्या थाटात उद्घाटन पार पडले त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी शिवसेना ऊबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमित निब्रड, शिवसेना विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले,माजी पंचायत समिती सभापती परशुराम जांभुळे,सरपंच संगीता खिरटकर,उपसरपंच विलास जिवतोडे, पोलीस पाटील सागर सांगुर्ले,बंडूजी पाटील,गणेश वाघ,वनसमीती अध्यक्ष अनील बावणे,चोरा शिवसेना शाखा प्रमुख,लक्ष्मण चौधरी, श्रीराम साव,ग्रामपंचायत सदस्य शिल्पा शेरकुरे,आदी मान्यवर उपस्थीत होते.
सदर स्पर्धेतील सामने हे साठ किलो वजनगटातील असुन स्पर्धेत विजेत्या ठरणाऱ्या पहिल्या चार संघांना आकर्षक चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार असुन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वैयक्तीक बक्षीसे देण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी स्पर्धेत सहभागी असलेल्या संघांना शुभेच्छा दिल्या.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment