Ads

संविधान दिनानिमित्त भव्य रैली.

भद्रावती तालुका प्रतिनिधी
जावेद शेख :-भद्रावती शहरात देशाचा संविधान दिन विवीध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या दिनाचे औचीत्य साधुन शहरातील हुतात्मा स्मारक येथुन भव्य रैली काढण्यात आली.या रैलीत पथनाट्य,संविधान प्रबोधन देखावे,लेझीम पथक,बैंड पथक,आदिवासी सांस्कृतिक पारंपरिक नृत्य समुह यासह नाविण्यपुर्ण वेशभुषेसह शहरातील शाळा,महाविद्यालयातील विद्यार्थी, सामाजीक सेवा संघटनेचे पदाधिकारी तथा नागरीक मोठ्या संखेनी सहभागी झाले होते.A grand rally on the occasion of Constitution Day.
सदर रैली हुतात्मा स्मारक येथुन निघुन बाळासाहेब ठाकरे प्रवेशव्दारापासून होत परत डा.आंबेडकर चौकात आली.त्यानंतर संविधानाच्या ऊद्देशीकेचे सामुहिक वाचन करुन रैलीचा समारोप करण्यात आला.यावेळी आ.प्रतिभाताई धानोरकर तहसीलदार अनीकेत सोनवणे, ठाणेदार बिपीन इंगळे तथा इतर मान्यवर उपस्थीत होते. यावेळी रैलीत सहभागी असणाऱ्यांना बिस्कीट तथा फळांचे वाटप करण्यात आले.त्यानंतर अ व ब गटात जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा घेण्यात आली.यात अ गटातून प्रथम क्रमांक काव्या कवाडे यांनी, व्दितीय क्रमांक गौरवी भिज यांनी तर तृतीय क्रमांक प्रकाश उमरे यांनी पटकाविला.तर ब गटातून प्रथम क्रमांक किरण वाकुडकर यांनी व्दितीय क्रमांक संविधान अवताडे यांनी तर तृतीय क्रमांक प्रेम जरपोटवार यांनी पटकाविला. सायंकाळी सहा वाजता संविधान सभेचे आयोजन करण्यात आले.या सभेला अजय पाटील, राजरतन पेटकर, प्रसिध्द वक्ते तथा मार्गदर्शक तुषार उमाळे,अनीकेत दुर्गे,कुशल मेश्राम, शंकर मुन,सुरेंद्र रायपुरे,सुरज गावंडे,प्रकाश पिंपळकर,विशाल बोरकर, डा.अमीत नगराळे,रविंद्र तिराणीक,संदीप ढेंगळेळसुशील देवगडे,सुनील मेश्राम, रत्नाकर साठे शाहिस्ताखाण पठाण, मिलींद वाघमारे, बिपीन देवगडे,मिलींद शेंडे,नितेश बानोत आदी मान्यवर उपस्थीत होते.कार्यक्रमाचे प्रस्तावीक प्राची वेलेकर यांनी संचालन भाग्यश्री शेंडे व सोनू चौधरी यांनी तर आभार मनोज पेटकर यांनी मानले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी राजरतन पेटकर, अनीकेत रायपुरे,प्रणय कांबळे, बादल बाराहाते थामसहदुधे,संकेत चिमुरकर,सोनू सिंग,पनवेल शेंडे, सुमित हस्तक,कुलीन शेंडे,फैय्याज शेख,सोनू बानागीरी,सिध्दार्थ पेटकर,वैभव पाटील, मारुती जांभुळे,कल्पना देवगडे, सुनीता खंडाळकर,विभा बेहरे,सोनू चौधरी, रेणुका साने,मानसी देव,भाग्यश्री शेंडे, विश्रांती उराडे,शब्बु रामटेके, प्राची वेलेकर,प्रिया रायपुरे, वैशाली पाटील, शिल्पा नगराळे,मालती पाटील, किरण कवाडे,झरना सरकार आदींनी सहकार्य केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment