Ads

जयभीम चौक घाटंजी येथे संविधान दिन उत्सवात साजरा

घाटंजी (तालुका प्रतिनिधी):-
दिनाक २६ नोव्हेंबर रोज रविवार ला घाटंजी येथे संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.तालुक्यातील समस्त संविधान प्रेमी यांनी एकत्रित येत संविधान दिनाच्या निमित्तानं संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले अमूल्य असे समता बंधुता न्याय आधारित एकत्र बांधून ठेवणारे दिलेलं दस्तऐवज म्हणजे भारतीय संविधान हा दीन सर्वत्र जगभर मोठ्या उत्सवात साजरा केला जातो.
Constitution Day celebrated with enthusiasm at Jaibhim Chowk Ghatji
२६ नोव्हेंबर याच दिवशी देशाला सर्व समावेशक एकत्रित बांधून ठेवणारी राज्यघटना अस्तित्वात आली २६ नोव्हेंबर संविधान दिनाच्या निमित्तानं भारतीय संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व संविधानाचा उद्देशिका प्रस्वाविक प्रतीमेला मान्यवरांच्या उपस्थितीत दिपबत्ती प्रज्वलित व पुष्पहार अर्पण करून भारतीय संविधानाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो भारतीय संविधानाचां विजय असो असा जयघोष करत अभिवादन करण्यात आले.त्यावेळी तालुक्यातील सर्वच संघटनिय कार्यकर्ते उपस्थित होते.ज्यात भीमशक्ती युवा मंडळ, संविधान प्रचारक,भारतीय बौद्ध महासभा,समता सैनिक दल, रीपबलिकन पार्टी ऑफ इंडीया,वंचित बहुजन आघाडी,विश्वरूप फाऊंडेशन,युवा पुरोगामी विचारमंच,सार्वजनिक जयंती उत्सव समिती घाटंजी ह्या सर्वच संघटनांचा पुढाकार होता.सर्वांनी संविधान दिनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लीहलेल्या संविधानाप्रती आपले मत व्यक्त केले पुष्पहार अर्पण केले,संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश घरडे प्रास्ताविक बी. टी वाढवे तर संविधान उद्देशिका चे वाचन सांविधान प्रचारक भाविक भगत यांनी केले,त्यावेळी विजय सिसले सर यांनी भीम वंदना बुद्ध वंदना घेतली,उपस्थितांनी आपली मते व्यक्ती केली, व उद्देशीका वाचनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.सर्वच मान्यवरांनी संविधान दिनी डॉ बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधान ला अभिवादन केले.कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रदीप रामटेके,संजय टिपले, रां.वी.नगराळे,रणजित नगराळे,सुनील वेले,मनोहर चांदेकर,विजय रामटेके,अशोक निमसरकार,सुनील नगराळे,बी. टी.वाढवे,विराज राऊत,योगेश कांबळे,सूरेश बिटोले, बंटी अटारा,विरंद्रा पिलावन,अनिल रामटेके,गुलाब सीसले,राजेश मेश्राम ,सचिन रामटेके,उमेश घरडे,सुजल भालेराव, प्रतीक पाटील आदी ची उपस्थिती होती,तालुक्यातिल समस्त संविधान प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उमेश घरडे,युवा पुरोगामी विचारमंचे अध्यक्ष भाविक भगत,वीरेंद्र पिलावान,सूरेश बिटोले,यांनी परिश्रम घेतले.
यश नगराळे.समीर लोहकरे.भूषण घोडेस्वार.
सुबोध मुनेश्वर.सम्यक मानकर.आदित्य वनकर.
अथरव वणकर ,प्रक्षिक पाटील सहील काळे अक्षय देवतळे. आदी युवा वर्ग उपस्थित होता.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment