जावेद शेख प्रतिनिधी भद्रावती:-
भद्रावती तालुक्यातील मौजा सावरी येथे नेहमी वाघ, अस्वल ,व वन्य प्राण्यांच्या वावर होत राहते सावरी हे गाव जंगल लगत असल्याने वन्य प्राण्यांच्या हैदोस वाढलेला आहे त्यामुळे गावातील कोंबडे बकरे व पाळीव प्राण्यावर हल्ले करीत आहे सध्या शेतीतील हंगामाचे कामे सुरू आहेत्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शेतात चरत असलेल्या दोन बैलांपैकी एका बैलावर वाघाने हल्ला करुन त्याला ठार मारल्याची घटना तालुक्यातील सावरी येथे दिनांक 16 रोज बुधवारला दुपारी 11वाजताच्या सुमारास घडली.यात शेतकऱ्याचे एक लक्ष रुपयांचे नुकसान झाले असुन ऐन हंगामात एक बैल मृत्युमुखी पडल्यामुळे पुढील शेतीहंगाम कसा करावा हा प्रश्न सदर शेतकऱ्यापुढे पडला आहे.
Bull killed in tiger attack.
या घटनेची तक्रार भद्रावती वनविभागाला करण्यात आली असुन याची त्वरीत नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी पिडीत शेतकऱ्याने केली आहे. सावरी येथील शेतकरी प्रफुल विश्वनाथ दडमल यांचे बैल शेतात चरत होते.दबा धरुन बसलेल्या वाघाने एका बैलावर हल्ला करुन त्याला ठार केले.यावेळी प्रफुल दडमल यांनी आरडाओरड केली मात्र वाघ त्यांचेवर गुरगुरला त्यानंतर त्यांनी मदतीला इतर गावकऱ्यांनाबोलावले व आरडाओरड केल्यानंतर वाघ पळून गेला. घटनेची माहिती व वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांना निवेदन देण्यात आले वनविभागाला सावरी येथील गावाजवळ लोखंडी जाळी लावून द्यावे व नुकसान भरपाई आठ दिवसात देण्यात यावी व गावाजवळ उपायोजना करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली . वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.मृत बैलाची किंमत एख लक्ष सांगण्यात आली आहे.
0 comments:
Post a Comment