जावेद शेख प्रतिनिधी भद्रावती : महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच पोषण, आरोग्य, शिक्षण आणि मुलींच्या संरक्षणाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’, ‘सेवा संकल्प अभियान’, ‘अंगणवाडी उत्सव’ तसेच ‘पोषण अभियानांतर्गत पोषण माह’ या उपक्रमांचे आयोजन पंचायत समिती सभागृहात करण्यात आले.
Public awareness and service commitment campaign on the occasion of Anganwadi Festival and Nutrition Month
या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्ह्य महीला व बालविकास अधिकारी एम.डी.भस्मे यांनी केले. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ होते.प्रमुख अतिथी सहा.गट विकास अधिकारी डॉ.बंडु आकनुरवार, बाविप्रअ.पुनम गेडाम,प्रशिक्षक अभिशेष मोहुर्लॅ,धर्मेंद्र मेश्राम,प्रिया पिंपळशेंडे,विस्तार अधिकारी स्नेहल चार्लॅकर होत्या.सुरुवातीला माॅ.जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दिव्पप्रज्वलन करण्यात आले. यावेळी मुलींचे शिक्षण,संरक्षण, बालविवाह प्रतिबंध, स्त्री-पुरुष समानता, मातृ व बाल आरोग्य, संतुलित आहार, कुपोषण प्रतिबंध, स्वच्छता तसेच पोषणाचे महत्त्व याबाबत प्रशिक्षकांनी व जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी मीनाक्षी भस्मे यांनी महिला व बालकांच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजना,अंगणवाडी केंद्र बालकांच्या सर्वांगीण विकासाचे माध्यम असल्याचे सांगितले.
गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांनी ग्रामीण भागातील महिला व बालकांच्या विकासासाठी विविध विभागांमध्ये समन्वय ठेवून काम करण्याची गरज व्यक्त करून शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी क्षेत्रीय यंत्रणेने लोकसहभाग वाढविण्यावर भर देण्याचे आवाहन केले.
सहा.गटविकास अधिकारी डॉ.बंडु आकनुरवार यांनी शासन निर्णयानुसार सेवा संकल्प अभियानाची माहीती देऊन आंगणवाडी केंद्रावर मुलासोबत माताना बोलवुन महीलांचे आरोग्य व पोषण संदर्भातील माहीती देऊन त्यांना योजनांचा झालेला लाभ विषद करण्यात येणार असल्याबाबत मनोगतात व्यक्त केले.बाविप्रअ पुनम गेडाम यांनी बालकांच्या वाढीचे नियमित निरीक्षण, पोषण स्थितीचे परीक्षण, पालकांचे समुपदेशन, आरोग्य तपासणी, पूर्वप्राथमिक शिक्षण तसेच माता-बालकांच्या आरोग्यविषयक जनजागृती करून ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाच्या माध्यमातून मुलींच्या जन्माचे स्वागत, मुलींना शिक्षणाची समान संधी आणि मुलींच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यात आली. आहार प्रदर्शनी ठेवण्यात आली. शेवटी पोषण अभियानांतर्गत जनजागृती रॅली काढण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्नेहल चार्लॅकर संचालन पर्यवेक्षीका विद्या श्रीरामे आभार कृतीला नैताम यांनी केले. तालुक्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविका उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment