राजुरा, दि.17 सप्टेंबर
नाशिक येथे २७ ते ३० सप्टेंबर ला होणाऱ्या ३६ व्या ज्युनिअर राष्ट्रीय थ्रोबाॅल स्पर्धेकरिता कु. अनुष्का भास्कर फरकाडे व कु. रियल रामटेके यांची महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे
त्या मिनाताई ठाकरे विभागीय संकुल, नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय थ्रोबाॅल स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. कु. अनुष्का भास्कर फरकाडे ही क्रीडा शिक्षक भास्कर फरकाडे यांची कन्या आहे ती जव्हेरी कन्या ज्यु. महा. बल्लारपूर ची विद्यार्थिनी आहे. कु. रियल मनोज रामटेके ही स्टेला मेरिस काॅन्वेंट स्कूल बामणवाडा राजुरा येथील विद्यार्थीनी आहे. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय चंद्रपूर जिल्हा थ्रोबाॅल असोसिएशन चे सचिव डॉ. राकेश तिवारी, अध्यक्ष किर्तीवर्धन दिक्षित, महा. थ्रोबाॅल संघटनेचे सचिव श्री. राहूल वाघमारे, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक भास्कर फरकाडे आई वडील, प्रशिक्षक कोमल वाकडे यांना दिले. अनुष्का व रियल च्या यशाबद्दल ज.क.ज्यु.महा. मुख्याध्यापिका श्रीमती आस्मा खान, स्टेला मेरिस काॅन्वेंट च्या मुख्याध्यापिका सिस्टर जाॅएल जोस, सिस्टर सजिवा डी. एम. राजुरा तालुका क्रीडा संयोजक हरिश्चंद्र विरुटकर, बादल बेले, किशोर चिंचोलकर, शबाना मॅडम, नेहा श्रीवास्तव व सर्व शिक्षकांनी, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या
0 comments:
Post a Comment