राजुरा : सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना मोठ्या आवाजात डीजे व साऊंड सिस्टीम वाजवून शासकीय आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात राजुरा पोलिसांनी धडक कारवाई केली. नवीन बस स्टॉपसमोर वाहनावर डीजे सुरू करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत डीजे साहित्य आणि महिंद्रा बोलेरो पिकअप असा एकूण ₹१२ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.DJ's illegal music became expensive; Rajura police raid, seized valuables worth ₹12.60 lakh
दिनांक १४ सप्टेंबर २०२६ रोजी राजुरा येथील नवीन बस स्टॉपसमोर एका वाहनावर बेकायदेशीररीत्या डीजे सुरू असल्याची गोपनीय माहिती राजुरा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली. माहितीच्या आधारे सपोनि लक्ष्मण लोकरे व पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी महिंद्रा बोलेरो पिकअप क्र. MH-34-BZ-5017 वर डीजे वाजवण्याची तयारी सुरू असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी वाहनचालक व मालकाकडे डीजे वाद्ये वाजवण्यासाठी आवश्यक अधिकृत परवान्याची चौकशी केली असता, त्यांच्याकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना मोठ्या आवाजात डीजे साऊंड सिस्टीम लावून ध्वनीप्रदूषण तसेच शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी डीजे साहित्य व वाहन ताब्यात घेतले.
याप्रकरणी पोलीस ठाणे राजुरा येथे अप. क्र. ७३०/२०२६ अन्वये कलम २२३ भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ सहकलम ३८ व १३६ महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताब्यात घेतलेले आरोपी
१) रवि सतीश एकनकर (वय २८)
व्यवसाय : डीजे मालक/ऑपरेटर
रा. फुलसिंग नाईक वार्ड, बल्लारशा
२) सचिन इन्चुलाल सरोज (वय २२)
व्यवसाय : चालक
रा. पंडित दीनदयाल वार्ड, बल्लारशा, जि. चंद्रपूर
₹१२.६० लाखांचा मुद्देमाल जप्त
- डायनॉटीक कंपनीचे २ साऊंड टॉप — ₹११,००,०००
- क्रीश कंपनीचे ४ साऊंड बेस — ₹२,००,०००
- क्राउन कंपनीची १ मशीन — ₹१,४०,०००
- कॉईनर कंपनीचा १ मिक्सर — ₹१,२०,०००
- किर्लोस्कर कंपनीचा १ जनरेटर — ₹१,००,०००
- महिंद्रा बोलेरो पिकअप क्र. MH-34-BZ-5017 — ₹८,००,०००
एकूण जप्त मुद्देमाल : ₹१२,६०,०००/-
पोलिसांची कडक कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व सहायक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
गुन्हे शोध पथकाचे सपोनि लक्ष्मण लोकरे, सफौ किशोर तुमराम, पोहवा विक्की निर्वाण, पोहवा अनुप डांगे, पो.अ. शफीक शेख, मिलिंद जांभुळे, रमेश बस्सी आणि राजीव दुबे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या तसेच विनापरवाना डीजे वाजवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राजुरा पोलिसांनी दिला आहे.
0 comments:
Post a Comment