Ads

दुचाकी चोराच्या मुसक्या आवळल्या!


चंद्रपूर : शहर व परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांनी डोकेदुखी ठरलेल्या रेकॉर्डवरील दुचाकी चोराच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत प्रतिक धनराज झाडे (वय ३३, रा. महाकाली वॉर्ड, चंद्रपूर) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चौकशीतून तब्बल ₹२ लाख ३० हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून, पाच दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. Motorcycle Thief Nabbed!

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी प्रतिक झाडे याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीच्या ताब्यात आढळलेली TVS मोटारसायकल क्रमांक MH-34-BU-5217 ही पडोली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अपराध क्र. २९१/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अंतर्गत चोरीस गेलेली असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

चौकशीत चोरीच्या दुचाकींचा ‘खजिना’ उघड

आरोपीची सखोल चौकशी केली असता त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे दुध डेअरी कॉलनी, चंद्रपूर येथील झाडी-जंगलासह इतर ठिकाणांहून चोरीच्या दुचाकी शोधून काढण्यात पोलिसांना यश आले.

हस्तगत करण्यात आलेल्या दुचाकी पुढीलप्रमाणे—

  • TVS मोटारसायकल MH-34-BU-5217 — ₹४०,०००
    पडोली पोलीस ठाणे, अपराध क्र. २९१/२०२६.

  • होंडा ॲक्टिव्हा MH-34-CA-4413 — ₹५०,०००
    रामनगर पोलीस ठाणे, अपराध क्र. ७३९/२०२६.

  • होंडा ॲक्टिव्हा MH-31-FL-7928 — ₹८०,०००
    बर्डी पोलीस ठाणे, जि. नागपूर, अपराध क्र. ५०६/२०२६.

  • हिरो स्प्लेंडर प्लस MH-34-AG-6839 — ₹६०,०००.

माणिकगड परिसरातही सोडली होती चोरीची दुचाकी

तपासात आरोपीने बल्लारशाह पोलीस ठाण्यातील अपराध क्र. ८४३/२०२६ मधील चोरीची पॅशन प्रो मोटारसायकल माणिकगड, राजुरा परिसरात बेवारस अवस्थेत सोडल्याचेही समोर आले. सदर मोटारसायकल यापूर्वीच पोलिसांनी जप्त केली आहे.

या कारवाईमुळे एकूण ५ दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, चार दुचाकींची एकूण किंमत ₹२ लाख ३० हजार आहे.

आरोपी पोलिसांच्या ताब्यात

आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुढील कायदेशीर कारवाई व तपासासाठी पोलीस स्टेशन पडोली, जिल्हा चंद्रपूर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या उपविभाग चंद्रपूर पथकाने केली.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment