चंद्रपुर :-चंद्रपुर जिल्हयातील गोवंश तस्कारांवर आळा घालण्याकरिता मा. पोलीस अधिक्षक, चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते. त्यावरून मौजा चिचपल्ली हहितून रात्रौ दरम्याण गोवंश ची अवैदयरीत्या वाहतुक होत असल्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक महेश कोंडावार यांनी विशेष पथक तयार करून त्यांना गोवंश तस्कांविरूध्द
कारवाई करण्याबाबत निर्देश दिले.
Local Crime Branch, Chandrapur Big action against cattle smuggling
स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर चे LCB Chandrapur विशेष पथकाने दि. ०१ / ११ / २०२३ रोजी रात्रौ दरम्यान मौजा चिचपल्ली हहित बसस्टॉप रोडवर सापळा रचून असता एक लाल रंगाची पॅशन मो.सा. तसेच सफेद रंगाची आय ठेवेटी चारचाकी वाहन क्रमाक MH 20 D- 4653 हे पेट्रोलींग वाहन ताब्यात घेवुन त्यांना विचारपुस केली असता त्यांनी सागितले कि मागेच काही अंतरार पिकअप क्रमाक AP 39 US 5572 हे वाहन काहि गोवंश निर्दयपणे कोंबून वाहतूक करीत येत आहे. असे सागितल्याने पुन्हा नाकाबंदी केली असतांना पिकअप क्रमाक AP 39 US-5572 हे वाहन दिसून आल्याने सदर वाहनास पथकाने थांबवले असता सदर वाहनात १४ जिवंत गोवंश निर्दयपणे कोंबून असल्याचे दिसले. सदर १४ जिवंत गोवंशची सुटका करून व वैदयकिय तपासणी करून प्यार फॉउंडेशन गौरक्षण संस्था, दाताळा येथे सुखरूप पोहचविण्यात आले. आरोपी १ ) वसिम रज्जाक कुरेशी वय २६ वर्षे रा. रय्यतवारी कॉलरी डिस्पेसरी चौक चंद्रपूर २) शाहाबाज रशिद खान वय २९ वर्षेरा. दुधडेरी जवळ जलनगर वार्ड चंद्रपूर, दुचाकी चालक ३) संताष बुध्दीलाल कोरी वय २८ वर्षे रा. रय्यतवारी कॉलरी डिस्पेसरी चौक चंद्रपूर ४) सोहेल अहमद शेख वय २० वर्षे धंदा डायव्हर रा. गोयगाव ता. वाकडी जि. आसिफाबाद राज्य तेलंगाना यांचे कडून एकूण १३,४८,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला व आरोपीतांविरूध्द पो.स्टे. रामनगर येथे अप.क्र. ११९२ / २०२३ कलम ११(१),(ड) प्रा.नि.वि. कायदा १९६०, सहकलम ५ अ (१), ५ ब, ९, ११ महा. प्रा. संरक्षण कायदा, सहकलम ८३, १३० / १७७ मोवाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कामगिरी मा. पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी सा., मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधू मॅ. यांचे मार्गदर्शना खाली महेश कोंडावार, पोनी स्थानिक गुन्हे शाखा यांचे नेतृत्वात पोहवा संजय आतकुलवार,सुरेद्र महतो, नापोअ संतोष यलपुलवार, गोपाल आतकुलवार दिपक डोंगर, गणेश मोहुर्ले, पोअ.गणेश भोयर, प्रदिप मडावी, गोपीनाथ नरोटे चालक पोहवा दिनेश अराडे ब.नं. यांनी यशस्वीपणे केली.
0 comments:
Post a Comment