Ads

महाराष्ट्र -तेलंगाना राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत भद्रावतीतील पाच खेळाडूंना सुवर्णपदक. Five athletes from Bhadravati won gold medals in Maharashtra-Telangana state level karate competition.

महाराष्ट्र -तेलंगाना राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत भद्रावतीतील पाच खेळाडूंना सुवर्णपदक.
भद्रावती तालुका प्रतिनिधी:-
 शहरातील शुभ प्रसंग लॉन येथे पार पडलेल्या दुसऱ्या महाराष्ट्र व तेलंगाना ओपन राज्यस्तरीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत शहरातील हुतात्मा स्मारक तायकांडो क्लबच्या पाच खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाचे सादरीकरण करून पाच सुवर्णपदके प्राप्त केली. या स्पर्धेत महाराष्ट्र व तेलंगाना राज्यातील जवळपास 300 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. Five athletes from Bhadravati won gold medals in Maharashtra-Telangana state level karate competition.
या स्पर्धेत मुलींच्या ब्लॅकबेल फाईट मध्ये दामिनी सूर्यवंशी हिने सुवर्णपदक प्राप्त केले. तसेच 30 ते 35 वजन गटात सोनाक्षी कोंडस्कर हिने सुवर्णपदक प्राप्त केले. मुलांच्या 25 ते 30 वजन गटातून श्रमण जुमडे याने सुवर्णपदक प्राप्त केले. स्पर्धेतील काता या प्रकारात 25 ते 30 वजन गटातून साची चावरे हिने सुवर्णपदक प्राप्त केले, तर 40 ते 45 वजन गटातून कशीश रोगे हिने सुवर्णपदक प्राप्त केले. यशस्वी खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय राकेश दीप, शितल तेलंग,संदीप चावरे या प्रशिक्षकांना व आपल्या पालकांना दिले. यशस्वी खेळाडूंचे शहरात शहरात सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment