भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:-भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव इम्रान खान यांची मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या भांदक रेल्वे स्टेशनच्या सल्लागार समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल इम्रान खान यांची प्रतिक्रिया घेतली असता भांदक रेल्वे स्थानकावर कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या रेल्वे गाड्यांचा पाठपुरावा करून रेल्वे गाड्या पुन्हा थांबवण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच भांदक रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मूलभूत व आवश्यक सुविधा देण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या निवडीबद्दल पालकमंत्री सुधिर मुनगंटिवार, माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, विधानसभा प्रमुख रमेश राजुरकर, आमदार बंटी भांगडिया, जिल्हाध्यक्ष हरिष शर्मा, देवराव भोंगळे, माजी आमदार सुदर्शन निमकर, अतुल देशकर, तसेच राहुल पावडे, आशिष देवतळे, चंद्रकांत गुंडावार, अहेतेशाम अली, अफजल खान, करण देवतळे, अमित गुंडावार, प्रविण सातपुते, किशोर गोवारदिपे, प्रशांत डाखरे, सुनिल नामोजवार यांनी अभिनंदन केले आहे.
0 comments:
Post a Comment