Ads

भद्रावती येथे गोंडियन आदिवासी वीर-वीरांगणा सोहळा. Gondian tribal Hero-heroine ceremony at Bhadravati.

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:-भद्रावती येथील गोंडीधर्मीय आदिवासी बहुउद्देशीय संघटनेतर्फे शहरातील नाग मंदिराजवळील जिल्हा परिषद हायस्कूल येथे विदर्भस्तरीय संपूर्ण गोंडियन आदिवासी वीर- वीरांगणा जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने शहरातील तहसील कार्यालया जवळील भीवसेन पेनठाणा येथून गोंड राजा महात्मा रावण यांच्या भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले.शोभायात्रेचे उद्घाटन आमदार प्रतिभाताई धानोरकर MLA Pratibhatai Dhanorkar यांच्या हस्ते पार पडले.
Gondian tribal Hero-Veerangana ceremony at Bhadravati.
यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर,माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे, गोंडीधर्मीय आदिवासी संघटनेचे अध्यक्ष रमेश मेश्राम, काँग्रेस शहराध्यक्ष सुरज गावंडे,एडवोकेट प्रमोद गेडाम, गोलू गेडाम,संदीप नैताम आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनानंतर भव्य शोभा यात्रेला प्रारंभ करण्यात आला. सदर शोभायात्रा हायवे, बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक,शहरातील मुख्य रस्त्याने निघून कार्यक्रम स्थळी पोहोचल्यानंतर शोभायात्रेची सांगता करण्यात आली. त्यानंतर अन्य विविध कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली. यात तेलंगाना इंद्रावेलीचे सुप्रसिद्ध गायक रवी मेश्राम तथा मेघराज मेश्राम यांच्या गायनाचा, प्रबोधनात्मक कार्यक्रम, पारंपारिक गोंडी नृत्य स्पर्धा आदी कार्यक्रमांचा सहभाग होता. सदर शोभा यात्रेत आदिवासी संस्कृतीला उजाळा देणारे विविध चित्ररथ, विविध आदिवासी नृत्य पथके, पारंपारिक वाद्य पदके तथा आदिवासी समाज बांधवांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. सदर कार्यक्रमात विदर्भातील यवतमाळ,चंद्रपूर गडचिरोली तथा अन्य जिल्ह्यातील आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. शोभायात्रेदरम्यान शिवसेना ऊबाठा जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे तथा संदिप कुमरे व मित्रपरिवार यांचे तर्फे शोभायात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांना नाश्ता व सरबतचे वितरण करण्यात आले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment