Ads

मुख्यमंत्री पोहोचताच आपच्या शिष्टमंडळासह अनेक ताब्यात आले.

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील बल्लारशाह बायपास महामार्गावरील अष्टभूजा बाबूपेठ मध्यभागी असलेल्या रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम पाच ते सहा वर्षांपासून रखडले आहे. यामुळे या ठिकाणी अनेक अपघात घडून अनेक लोकांचे बळी गेले आहेत. नुकतेच दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात चार निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. याकडे आज बुधवारी फलक लावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधण्यात आले.As soon as the Chief Minister arrived, many were detained along with AAP delegation
यावेळी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करीत फलक लावून लक्ष वेधून घेतले. मुख्यमंत्री यांना आम आदमी पक्षाच्या निवेदनाची भिति वाटल्याने आपच्या शिष्टमडळासह अनेक ताब्यात घेण्यात आले.

आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे म्हणाले की, सदर ब्रिजचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी वरोरा चंद्रपूर बल्लारपूर टोल रोड (WCBTRL) कंपनीची आहे. मात्र, कंपनीने या कामाकडे दुर्लक्ष केले आहे. बांधकाम विभागाने देखील कंपनीला वेळेवर कारवाई केली नाही.

या विरोधात आम आदमी पार्टीने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि रामनगर पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे. मात्र, अद्याप दोषींवर कारवाई झालेली नाही.

या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने निषेध केला आहे. आम आदमी पार्टीच्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत:
दोषींवर भादवि कलम 304, 308 अनुसार कायदेशीर कारवाई करावी.
सदर ब्रिजचे काम एक महिन्याच्या आत तात्काळ सुरू करावे.
कुडे यांनी सांगितले की, या मागण्या 10 दिवसांत पूर्ण न झाल्यास किंवा लेखी स्वरूपात पत्र न दिल्यास आम आदमी पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
आप नेते सुनील मुसळे, जिल्हा अध्यक्ष मयूर राईकवार,युवा जिल्हा अध्यक्ष राजू कुडे, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे,जिल्हा संघटन मंत्री नागेश्वर गंडलेवर, जिला उपाध्यक्ष योगेश मुऱ्हेकर जिल्हा सचिव राजकुमार नागळाले आणि प्रशांत शिदूरकर, महानगर संघटन मंत्री संतोष बोपचे, बल्लारपूर शहर सचिव ज्योती बाबरे, महानगर महिला अध्यक्ष तब्बसूम शेख, अशोक माहूरकर, अश्रफ शेख, शगीर सय्यद, सिकेंदर सागोरे, सुनील सदभय्या, सुजित चेडगूलवार, अनुप तेलतूमडे सोबत इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांना ताब्यात घेण्यात आले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment