Ads

सरकारी पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा

भद्रावती तालुका प्रतिनिधी :- येणं पिक काढणीच्या वेळी सोयाबीन पिकावर येलो मोयजक आणि इतर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक गेलं आणि त्यामुळे शेतकऱ्यांना ८० टक्के नुकसान झाले.आणि पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झालेले असताना चंद्रपूर जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांना २५ टक्के नुकसान भरपाई दिवाळीच्या अगोदर देण्याचे आणि नंतर उत्पादनात किती घट झाली त्यानुसार नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले .Farmers mocked by government crop insurance company
मात्र जिल्ह्यासाठी असलेली द ओरीयंट इन्शुरन्स कंपनीने मात्र आदेशाचे पालन केले नाही.आणि वर्षाच्या अखेर नाममात्र ५- १० टक्के नुकसान भरपाई देण्यात आली.शेजारील असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पीकविमा नुकसान भरपाई मिळाली असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेगळा न्याय कसा काय.असा प्रश्न अन्नदाता एकता मंचने केला आहे.
मागील वर्षी सुद्धा HDFC agro insuranace कंपनीने स्वतःच नुकसान झालेले पंचनामे स्वतः बदलवून शेतकऱ्यांना नाममात्र नुकसान भरपाई देण्यात आली तेव्हा अन्नदाता एकता मंचाच्या माध्यमातून शेकडो महिला जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय चंद्रपूर येथे धडकल्या नंतर पिपरी (देश) तालुका भद्रावती येथील शेतकऱ्यांना वाढीव १५ लाख नियमानुसार पीकविमा नुकसान भरपाई मिळाली.

केंद्र सरकारची कंपनी असून सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन सुद्ध शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल तर शेतकऱ्यांना स्वतःच्या न्यायासाठी लढवच लागेल.
काही सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना तर दोन आखडी रक्कम नुकसान भरपाई म्हणून मिळाली आहे.
जर सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना नियमानुसार पीकविमा नुकसान भरपाई मिळत नसेल तर आमच्या हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरू पण आम्ही आमच्या हक्काची नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा अन्नदाता एकता मंचचे अध्यक्ष श्री संदीप कुटेमाटे,संस्थापक अनुप कुटेमाटे,मोहन दर्वे,विठ्ठल अर्जूनकर,अमोल क्षीरसागर,धनराज भोयर,गजानन भोयर,योगेश मत्ते,अक्षय कुटेमाटे,डोमा कुटेमाटे, धनराज बोबडे, साहिल काकडे आणि शेतकऱ्यांनी दिला आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment