Ads

नवा कायदा रद्द करण्यासाठी आटो रिक्षा संघटनांचे तहसीलदारांना निवेदन.

तालुका प्रतिनिधी भद्रावती (जावेद शेख):-केंद्र शासनाने नवा चालक कायदा लागू केला आहे. हा कायदा चालकांवर अन्याय करणारा असल्यामुळे हा कायदा रद्द करण्यात यावा,ई ऑटो रिक्षांना परमिट लागू करण्यात यावे व ऑटो चालकांसाठी घोषणा करण्यात आलेली कल्याणकारी मंडळाची त्वरित अंमलबजावणी करावी यासाठी शहरातील युवा परिवर्तने ऑटो असोसिएशन तथा भद्रावती ऑटो असोसिएशन तर्फे येथील तहसीलदारांना दिनांक तीन रोज बुधवारला निवेदन सादर करण्यात आले आहे.
Auto Rickshaw Association's statement to Tehsildar to repeal the new law.
नव्या कायद्यानुसार चालकाच्या हातून अपघात झाल्यास व चालक घटनास्थळावरून पळून गेल्यास त्याला दहा वर्षाची शिक्षा तथा सात ते दहा लक्ष रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. हा कायदा चालकांवर अन्याय करणारा असून यामुळे चालकांचे आयुष्य व कुटुंब उद्ध्वस्त होण्याची शक्यता असल्यामुळे हा कायदा रद्द करावा, शहरात सध्या इ ऑटो रिक्षा मोठ्या प्रमाणावर येत असून त्यांना परमिट लागू करण्यात यावे,त्याचप्रमाणे ऑटो चालकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्याची घोषणा शासनातर्फे दहा वर्षांपूर्वी करण्यात आली होती. मात्र त्याची अमलबजावणी अद्याप पर्यंत करण्यात आली नाही. या मंडळाची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.निवेदन सादर करताना कल्याण मंडल, बाळू ऊपलंचीवार, प्रशांत दुबे, कैलास साखरकर, दिनेश बडकेलवार, सनमोहन केशवन, यशस्वी सहारे, प्रकाश मेंढे, बबलू पठाण, बंडू टेंमुर्डे ,संजय शेंडे ,रमेश पाटील, राहुल रामटेके, भुजंग सहारे तथा दोन्ही ऑटो संघटनांचे सदस्य उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment