Ads

चंदनखेडा येथे स्वामी विवेकानंद व राष्ट्माता जिजाऊ माँ साहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी .

भद्रावती तालुका प्रतिनिधी(जावेद शेख ):-भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथे काल दिनांक .१२-जानेवारी २०२४ शुक्रवार राष्ट्रीय युवा दिवस निमित्त व औचित्य साधून चंदनखेडा येथील किसान भवन प्रमोद महाजन ग्रामीन कौशल्य विकास केंद्र, येथे नेहरु युवा केंद्र, चंद्रपूर (युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार)व बार्टी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने व शौर्य क्रिडा मंडळ व बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत चंदनखेडा यांच्या सहकार्याने स्वामी विवेकानंद व राष्ट्माता जिजाऊ माँ साहेब यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली .
The birth anniversary of Swami Vivekananda and Rashtmata Jijau Ma Saheb was celebrated with great enthusiasm at Chandankheda.
उपस्थितांनी स्वामी विवेकानंद व राष्ट्माता जिजाऊ माँ साहेब यांच्या प्रतिमेच्या फोटो चे पुजन साबिया शेख यांच्या हस्ते करण्यात आले व कार्यक्रमाची सुरुवात केली.
यावेळी कार्यक्रमाला तिथे उपस्थित बार्टि चे भद्रावती तालुका समतादुत गणेश हनवते यांनी उपस्थितांना स्वामी विवेकानंद व राष्ट्माता जिजाऊ माँ साहेब यांच्या कार्यावर प्रकाश टाकून सखोल असं मार्गदर्शन केले , तसेच उपस्थित मोहीत शेंडे यांनी सुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कुणाल ढोक यांनी केले तर आभार प्रदर्शन जयश्री भरडे यांनी केले. यावेळी तिथे प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र संस्थेचे प्रशिक्षणार्थी ,तनवी हनवते,सुहानी भोस्कर,प्रियंका ढोक,सिमरन शेख, पल्लवी हनवते,स्वेता भोस्कर, प्रतिक्षा भरडे, नेहरु युवा केंद्राचे भद्रावती तालुका माजी समन्वयक आशिष हनवते यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.उपस्थित गावातील संलग्न क्रिडा मंडळाचे सदस्य भुपेश निमजे, निखिल ढोक,सौरभ बगळे,सागर गुरूनुले, स्वप्निल वाटेकर, विकास नन्नावरे, नवयुवक तरुण व तरुणी प्रामुख्याने उपस्थित होत्या.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment