ब्रम्हपूरी (प्रशांत गेडाम):-ब्रम्हपुरी शहरात दुपारी बारा वाजता ट्रॅकच्या धडकेत एका विद्यार्थ्यांनीचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना आज दिनांक: १२/१/२०२४ ला घडली आहे.समीक्षा संतोष चहांदे वय वर्ष १७ असे असून मृतक युवतीचे नाव असून मृतक युवती मालडोंगरी येथील रहिवाशी आहे.
समीक्षा ही आंबेडकर कॉलेज इयत्ता ११ वी मध्ये शिक्षण घेणारी विद्यार्थिनी असून वार्षिक स्नेह संमेलन असल्याने बारा वाजता दरम्यान युवती कॉलेज मध्ये जात असतांना धान्य वाहतूक करणाऱ्या ट्रकने समीक्षाच्या सायकलला मागून धडक दिला ज्यात ट्रकचे चाक शरीरावरून गेल्याने समिक्षाचा जागीच मृत्यू झाला.सदर घटना ही नेवजाबाई हितकारीनी कॉलेज गेट व कृषी उत्पन्न बाजार समिती व्यावसायिक गाळ्यांसमोर घडली आहे.साठ फूट मोठा रस्ता असतांना इलेक्ट्रिक पोल व गाळ्यांचे शेड तसेच मुरमाळ भरणामुळे झालेल्या अतिक्रमाणाने वहीवाट फक्त 15-20 फूटचं शिल्लक राहिली असल्याने रस्ता अरुंद झालेला आहे.मात्र नगरपरिषद प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने सदर अपघात घडला असे आक्रोशीत जनता चर्चा करत आहे.
शाळा कॉलेज परिसरातील मुलांची मोठी गर्दी सदर रस्ताला असते त्यातच मोठं मोठ्या जड वाहनांची तसेच अवैध मुरूम तस्करी करणाऱ्या वाहणांची सदर रस्त्याने नेहमी वर्दळ असते परिणामी अशा अपघाताची शक्यता बळावली असतांना कुठलीही काळजी प्रशासनाने घेतली नाही परिणामी एका मुलीला जीव गमवावा लागल्याने नागरिकांचा मोठा रोष प्रशासनावर दिसून येत आहे.
समीक्षाच्या पच्छात्य आई बाबा बहीण भाऊ असा लहानगा परीवार आहे.कुटुंबातील मोठी मुलगी गेल्यामुळे चहांदे कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावपरिसर शोकसागरात बुडालेला आहे.घटनेचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलिस विभागाचे अधिकारी कर्मचारी करीत आहेत.
0 comments:
Post a Comment