Ads

सांसद आदर्श ग्राम चंदनखेडा येथे गणराज्य दिन मोठ्या थाटात साजरा करण्यात आला

तालुका प्रतिनिधी जावेद शेख:-
भद्रावती तालुक्यातील सांसद आदर्श ग्राम म्हणून नावारूपास आलेल्या मौजा चंदन खेडा येथे मोठ्या थाटात गणराज्य दीन साजरा करण्यात आला. सांस्कृतिक वारसा लाभलेल्या या चंदन खेडा गावत कोणतेही शासकीय सन उत्सव मोठ्या थाटात साजरा केल्या जाते.
Republic Day wascelebrated with grandeur at MP Adarsh ​​Village Chandankheda
दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुधा मौजा चंदन खेडा येथे 75 वा गणराज्य दीन साजरा करण्यात आला सकाळ सत्रात सर्व शाळांची प्रभात झाकी च्या माध्यमातून गावात काढण्यात आली आणि त्यात वेगवेगळे वेश भूषा करून संदेश देण्यात आले सर्व प्रथम भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे गावातील पुढारी व्यक्ती च्या वतीने मांल्याप्रन करून पूजन करण्यात आले आणि गावातील गांधी चौकात गांधीजीच्या पुतळ्याचे पूजन करून गावाचे उपसरपंच सौ. भारतीताई उरकांडे यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आला. आणि ग्रामपंचायत कार्यालयातील झेंडा वंदन गावचे युवा सरपंच श्री नयन बाबाराव जांभुले यांच्या हस्ते करण्यात आले लगेच ग्रामपंचायत च्या वतीने घेण्यात येणाऱ्या स्पर्धात्मक सांस्कृतिक कार्यक्रम ला सुरवात करण्यात आली या मध्ये गावातील सर्व शाळाचे दर्शनीय कवायत घेण्यात आली त्या मध्ये अंगणवाडी पासून सर्व शाळा नी सहभाग घेतला आणि यावेळी श्री. देवेंद्र रणदिवे श्री सुधीरभाऊ मुडेवार श्री नयन जांभूळ यांच्या कडून सर्व शाळांचे विद्यार्थ्याना अल्पोहर देण्यात आले आणि सायंकाळी गावातील बक्षीस दात्यांच्या सहकार्याने सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले या सांस्कृतिक कर्यामाचे उद्घाटन या क्षेत्राच्या लाडक्या आमदार मा. प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले आणि आदर्श गावाचा अभिनव उपक्रम म्हणून सरपंच शिक्षण योजना या योजनेचे आमदार मोहदयाच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष बिपिन इंगळे पोलीस निरीक्षक भद्रावती हे होते आणि प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार पठाण साहेब, गावचे सरपंच नयन बाबाराव जांभूले, उपसरपंच सौ भारती उरकांडे सामाजिक कार्यकर्ते श्री. सुधीर भाऊ मुळेवार, माजी सरपंच सूमित भाऊ मुळेवार, ग्रामपंचायत सदस्य श्री बंडूजी निखाते, श्री. निकेश भागवत, श्री. नाना बगडे सौ. मुक्ता सोनुले सौ. प्रतिभा दोहतरे, सौ. रंजना हनवते, सौ. सविता गायकवाड, सौ. श्वेता भोयर, सौ. आशा नन्नावरे, सामाजिक कार्यकर्ते श्री. ईश्वर धांडे शां. व्यं. स. अध्यक्ष श्री. अनिल कोकूडे, महात्मा गांधी तंटमुक्त अध्यक्ष मनोहर हनवते पोलीस पाटील समीर खान पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment