भद्रावती तालुका प्रतिनिधी :- तालुक्यातील काटवल (तु) येथील राॅक्स क्रिडा मंडळाला नेहरू युवा केंद्र चंद्रपूर (युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार) च्या वतीने व माजी तालुका समन्वयक भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील आशिष सुरेश हनवते यांच्या पुढाकाराने भद्रावती तालुक्यातील काटवल (तु)येथील राॅक्स क्रिडा मंडळ यांना आज दिनांक.१७ जानेवारी २०२४ ला नुकतेच विविध स्पर्धात्मक जसे की हाॅलीबाल,गोडा,बॅटबिंटन,चेस, फुटबॉल, इत्यादी क्रिडा साहित्याचे
Distribution of sports materials to Rax Sports Board at Katwal (Tu).
काटवल तु येथील पंचशील बुद्ध विहार चौक काटवल तु येथे महात्मा गांधी तंटामुक्त समिती चंदनखेडा चे अध्यक्ष मनोहर शालीक हनवते यांच्या प्रमुख उपस्थितीत व काटवल तु चे सरपंच भिमराव सांगुडे, ग्रामपंचायत सदस्य अजय सोरदे, त्यांच्या हस्ते मंडळाच्या उपस्थित मोफत साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी राॅक्स क्रिडा मंडळ काटवल (तु)चे अध्यक्ष जुगल भैसारे, सचिव संकेत भैसारे,कोष्याध्यक्ष पल्लवी सोरदे,शितल जनबंधू, सदस्य सचिन जनबंधू, सौरभ इंदोरकर,कल्याणी सोरदे, भास्कर भैसारे,सुभाष टेंभूणे, शौर्य क्रिडा मंडळ चंदनखेडा चे कुणाल ढोक व नेहरू युवा केंद्राचे भद्रावती तालुका माजी समन्वयक आशिष सुरेश हनवते प्रामुख्याने उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment