Ads

अनेकांच्या अनेक प्रयत्नानंतर चंद्रपूर-राजुरा-चेन्नूरमार्गे सिरोंचासाठी धावली आज लालपरी Today State Transport Bus ran for Sironcha through Chandrapur-Rajura-Chennur after many attempts

चंद्रपूर :-अनेकांच्या अनेक प्रयत्नानंतर चंद्रपूर-राजुरा-चेन्नूरमार्गे सिरोंचासाठी आज लालपरीची सेवा सुरू करण्यात आली असल्याचे आनंद माझ्यासहित सिरोंचा वासियांना होत आहे असे प्रतिपादन भाजयुमो महानगर जिल्हाकारिणी सदस्य महेश कोलावार यांनी केले आहे.
Today State Transport Bus ran for Sironcha through Chandrapur-Rajura-Chennur after many attempts

पुढे बोलतांना कोलावार म्हणाले की वर्ष २०२० मध्ये सदर मागणीचा अट्टहास धरला असून याबाबतीचे पहिले निवेदन आपणच पुर्व विभागीय नियंत्रक आर.एन पाटील यांची भेट घेत सादर केले होते.

मध्यंतरी काळात देखील सिरोंचाचे माजी आमदार पेंटा रामा तलांडी,माजी तहसीलदार शंकर पुप्पालवार यांच्याही सुचनेनुसार आपण
या मागणीबाबतचे विषय घेऊन विभागीय कार्यालयात विचारपूस करत लालपरी सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवावेत अशी मागणी करत आले.

यानंतर खासदार अशोक नेते यांनी स्वत: सिरोंच्याला बैठक घेत विभागीय नियंत्रक कार्यालयाला सुचना करत आंतरराज्यीय परवानगी घेण्याचे सुचविले होते.
त्यानंतर अनेकांनी याबाबत निवेदन सादर केले होते.

अश्या अनेकांच्या प्रयत्नांना यश आल्याचे आनंदाची बातमी घेऊन भाजयुमो महानगर जिल्हाकारिणी सदस्य महेश कोलावार यांनी विभागीय नियंत्रक स्मिता सुतावने यांची सदिच्छा भेट घेत त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे स्वागत व अभिनंदन करत आभार मानले. सोबतच ही लालपरी सेवा सतत सुरू ठेवण्याची व दुपारच्या वेळेत बदल करून ३ वाजताच्या नंतर चालवावी अशी विनंती केली असता विभाग नियंत्रकांनी लालपरी सेवेच्या आर्थिक नफा - तोटांचा विचार करत सदर सेवा मागणीनुसार सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.

तर अनेक प्रयत्नानंतर आज सिरोंचासाठी लालपरी रवाना होतांना सकाळी कार्यालयीन अधिकारी - कर्मचा-यांनी चालक,वाहक व प्रवाशांचे पुष्पगुच्छाने स्वागत करत पहिल्या प्रवासाचा शुभारंभ केला तर दुपारच्या फेरीत महेश कोलावार यांनी चालक,वाहक व प्रवाशांचे पुष्पगुच्छाने स्वागत करत पहिल्या दिवसातील दुस-या फेरीच्या प्रवासाचा शुभारंभ केला.ही लालपरी दररोज सकाळी ७ वाजता व दुपारी २ वाजता चंद्रपूरहून चेन्नूरमार्गे सिरोंचासाठी रवाना होणार आहे.

यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी पुरूषोत्तम व्यवहारे, आगार प्रमुख प्रितेश रामटेके, सहाय्यक वाहतूक अधिक्षक हेमंत गोवर्धन,वाहतूक निरीक्षक अंकित कामतवार,सहाय्यक वाहतूक निरीक्षक निलेश जुनघरे,भाजयुमो महानगर जिल्हाकारिणी सदस्य महेश कोलावार,चालक सुमित शेंडे,वाहक सचिन बैलनवार, नवनाथ वाढीकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment