Ads

नवरगाव परिसरात चोरटी रेतीची तस्करी करणाऱ्या मोठ्या तस्कराचे ट्रॅक्टर अखेर जप्त : सिंदेवाही तहसील कार्यालयाची मोठी कारवाही

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही: सिंदेवाही तहसील अंतर्गत येणाऱ्या उमा नदी पात्रातून सध्या सर्रासरेतीची तस्करी सुरू असून रेती तस्करांनी अनेक चोरटे मार्ग तयार करून रेतीची चोरी करणे सुरू केले आहे. असे असताना तालुक्यातील सरांडी मार्गावर काल रात्रीला अवैध रेतीची वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त केले. The tractor of a big smuggler who smuggled stolen sand in Navargaon area was finally seized
Big operation of Sindevahi Tehsil Office
सविस्तर वृत्त असे कि,
सिदेवाही तालुका हा रेतीसाठी प्रसिद्ध असून या तालुक्यात मागील आठ से नऊ रेती घाट लिलाव करण्यात आले होते. असे असले तरी तालुक्यात अनेक रेती तस्कर तयार झाले असून मिळेल त्या मार्गाने रेतीची चोरटी वाहतूक करण्यात पटाईत झाले आहेत. सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव जवळ रत्नापूर - सरांडी रोड मार्गावर एक ट्रॅक्टर ने रेती तस्करी केल्या जात असल्याची गोपनीय माहिती सिंदेवाहीचे गौण-खणीज पथक
यांना मिळाली पथकातील तलाठी व मंडळ अधिकारी यानी अवैध रेती वाहतूक करणा-यांबर पाळत ठेवत अखेर काल रात्रौ 12-30 वाजता सुमारास सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव सरांडी रोड मार्गावर अवैध रेती ने भरलेला विना क्रमांकाच्या वाहन ट्रॅक्टर पकडला असून ट्रैक्टर तहसील कार्यालयात जप्त केला आहे.सदर कारवाई करण्यात आलेले ट्रॅक्टर हे नवरगाव येथील प्रमोद कामडी याची असल्याचे सांगण्यात येत आहे हा प्रत्येक ठिकाणाहून चोरीची रेती तस्करी करणारा असल्याचे नागरिकांत चर्चा आहे. गौण खनिज कायद्याअंतर्गत सदर ट्रॅक्टर वर एक लाख सतरा हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली असल्याची माहिती सिंदेवाही तहसीलदार यांनी दिली आहे.
सदर कारवाई तहसिलदार संदीप पानमंद यांच्या आदेशान्वये गौण खनिज पथकातील तलाठी व मंडळ अधिकारी यांनी केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment