भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख :-भद्रावती शहरालगत असलेल्या बरांज येथील एम्टा कोळसाखान परिसरात एका मेक्यानिकल कामगारांने सीट बेल्टच्या सहाय्याने एका ट्रकला लटकून व गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक १९ रोज शुक्रवारला सकाळच्या वेळेस उघडकीस आली.
Worker commits suicide by hanging himself in Baranj coal mine area.
संजय मोचीराम नायक वय 26 वर्ष असे मृतकाचे नाव असून तो ओरिसा राज्यातील रहिवासी आहे. घटनेची माहिती प्राप्त झाल्यावर भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आवश्यक ती कारवाई केली व मृतदेह शवविच्छेदनासाठी भद्रावती ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. सदर युवक हा एम्टा कोळसाखान कंपनीत कार्यरत असलेल्या एक्सप्रेस कंपनीत मेकॅनिकल म्हणून होता अशी माहिती कळते. त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही. पोलिसांनी मृतकाच्या ओरिसा येथील नातलगांना याची माहिती दिली असून घटनेचा पुढील तपास ते करीत आहे.
0 comments:
Post a Comment