Ads

गडचांदूर शहरात एकाच आठवड्यात 'पॉस्को'च्या दोन गुन्ह्यांची नोंद.!

गडचांदूर :- नवीन वर्षाच्या पंधरवड्यातील एकाच आठवड्यात गडचांदूर शहरात दोन जणांवर पॉस्को अंतर्गत गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
Two crimes of 'POSCO' reported in Gadchandur city in the same week!
पाच दिवसापुर्वी एसटी बस वाहक मुनीर शेख वयवर्ष अंदाजे 32,तर आता बिल्डर अनीस खान वयवर्ष अंदाजे 28,याच्या विरोधात गडचांदूर पोलीस स्टेशन येथे पॉस्कोचा गुन्हा दाखल झाला आहे.एका प्रकरणात,जिवती तालुक्यातील एक 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी दररोज जिवतीवरून गडचांदूर,येथे शाळेत शिक्षणासाठी येत असताना एसटी बस वाहक मुनीर सोबत तीची ओळख झाली. दरम्यान काही दिवसानंतर मुनीरने तिला चक्क प्रपोज केले.मात्र तीने याकडे दुर्लक्ष केले. परंतू नेहमी एसटीने शाळेत ये-जा करावी लागत असल्याने दोघात कधी कधी बोलचाल व्हायची. एकादिवशी दुपारच्या सुमारास मुनीर,हा बाईक घेऊन शाळेजवळ मुलीची वाट बघत उभा होता.सुट्टी होताच त्याने मुलीला सोडण्याच्या बहाण्याने बाईकवर बसवले आणि इसापूर मार्गे जात असताना गावातील काही नागरिकांच्या निदर्शनास आले.याची माहिती मुलीच्या आईला मिळताच तिने गडचांदूर पोलीस स्टेशन गाठले आणि 'एक विवाहित पुरूष माझ्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणूक' करीत असल्याची तक्रार दिली. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी बस वाहक मुनीरला अटक करून पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला.सदर प्रकरण 10 जानेवारी रोजीचे असून दुसरे प्रकरण 16 जानेवारी रोजी घडले आहे.
यामध्ये गडचांदूर येथील एका शरीरसौष्ठव स्पर्धेत पुरस्कार विजेता बॉडी बिल्डर अनीस खान,याने गडचांदूर येथील एका अल्पवयीन मुलीचे व्हिडीओ सोशल मीडियावर ठेऊन तिच्याबद्दल काही आक्षेपार्ह मजकूर लिहिला.काही दिवसानंतर तोच व्हिडिओ त्याच्या मित्राने सोशल मीडियावर टाकला.दरम्यान याची माहिती मिळताच पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.अनीसच्या मित्राने हा व्हिडिओ सोशल मीडियावरून घेतल्याची माहिती आहे.पोलिसांनी बिल्डर अनीसला अटक करून आयटी एक्ट व पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 15 दिवसाचा एमसीआर दिल्याचे कळते.सदर दोन्ही आरोपी हे विवाहित असून यांनी केलेले हे कृत्य,अशोभनीय आहे. 'जैसी करणी वैसी भरणी' याचे समर्थन कुणीच करणार नाही,अशी भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment