Ads

संत जगनाडे महाराज जयंती महोत्सवाचे द्विदिवशीय आयोजन....

तालुका प्रतिनिधी जावेद शेख
भद्रावती:-संत संताजी जगनाडे महाराज यांचा जयंती महोत्सव भद्रावती येथील संताजी स्नेही मंडळ भद्रावती द्वारे २० व २१ जानेवारी २०२४ ला आयोजित करण्यात आला आहे. या जयंती महोत्सवाला भद्रावती तालुक्यातील समस्त समाज बांधवांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन संताजी स्नेही मंडळ भद्रावतीच्या वतीने करण्यात आली आहे.
Two-day organization of Sant Jaganade Maharaj Jayanti Mahotsava....

संतश्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज यांची जयंती भद्रावती येथील संताजी कार्यालयात संपन्न होणार आहे. या संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त दोन दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. २० जानेवारीला घटस्थापना व मूर्तिपूजन, महिलांचे हळदी कुंकू कार्यक्रम, महिलांसाठी होम मिनिस्टर तसेच सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे व मनोरंजन कार्यक्रम आयोजित केले आहे. तर रविवारी २१ जानेवारीला संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त भद्रावती शहरातून भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शोभायात्रेचे उद्घाटन डॉ भगवान गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे या शोभायात्रेच्या प्रसंगी राजेश बेले, नंदकिशोर पिपराडे, किशोर गाठले किर्ती कात्रे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
त्यानंतर सायंकाळी ४ वाजता मुख्य प्रबोधन व मार्गदर्शन कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष अतुल वांदीले, प्रदेश सरचिटणीस नागपूर , उद्घाटक सुमेध खनके साहेब भद्रावती , डॉ प्रकाश महाकाळकर साहेब, गटशिक्षणाधिकारी, प्रमुख अतिथी सुधीरभाऊ मुनगंटीवार, पालकमंत्री व वने सांस्कृतिक कार्य महा.राज्य, आमदार प्रतिभाताई धानोरकर, अभिजीत वंजारी हे उपस्थित राहणार आहेत . प्रमुख पाहुणे
अनिलभाऊ धानोरकर, माजी नगराध्यक्ष भद्रावती, योगिताताई पिपराडे, माजी नगराध्यक्ष गडचिरोली , ओमभाऊ मांडवकर, समाजसेवक, निलेश बेलखेडे सिनेट सदस्य, आशिष देवतळे, कार्याध्यक्ष प्रांतिक तैलिक महासभा, श्री राजेश बेले, मीनाक्षी गुजरकर , डॉ प्रेरणा कोलते, श्रुतिका घाटे, छबूतताई वैरागडे, प्रशांत साखरकर साहेब, विवेक पोहाणे साहेब, श्री यश बांगडे सिनेट सदस्य हे उपस्थित राहणार आहेत.

संताजी महाराज जयंती महोत्सवानिमित्त समाजातील विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान, सत्कार मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या दोन दिवस होणाऱ्या कार्यक्रमात भद्रावती तालुक्यातील समस्त समाज बांधवांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे व मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संताजी स्नेही मंडळ कार्यकारिणी समितीने केलेले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment