चंद्रपूर :- जिल्हयामध्ये होत असलेल्या अवैध धंदे अवैध हत्यार बाळगणा-या इसमाची माहीती काढुन त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश मा.श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधिक्षक, चंद्रपूर मा. रिना जनंबधु अप्पर पोलीस अधिक्षक चंदपुर यांनी दिले होते.त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रपूर मा.महेश कोंडावार यांचा नेतृत्वात पथक अवैध रीत्या बाळगण्यावर माहीती काढुन त्यावर कार्यवाही करण्याची मोहीम राबवित होते.
गोपनीय माहीती मिळाली कि,तुकुम तलाव, चंद्रपुर येथील के.जि.एन पान सेंटर जवळ एक इसम आपले कमरेला गावटी बनावटीचे रिवॉल्वर लावुन उभा आहे. सदर माहीती वरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ रवाना होवुन सदर इसमास ताब्यात घेवुन त्याची तपासणी केली असता सदर ईसमाच्या कमरेला लागुन असलेल्या काळ्या बॅग मध्ये एक गावटी बनावटीचे रिवॉल्वर व त्यात वापरण्यात येणारे 05 नंग जीवंत काडतुस मिळुन आले. सदर ईसम्प्रस त्याचे नाव विचारून क्राईम रेकॉर्ड चेंक केले असता गुन्हे दाखल असल्याची माहीती मिळाली आहे. सदर आरोपी विरूध्द पोस्टे रामनगर येथे कलम 3,25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात येवुन आरोपी जुबेर साहेबअली शेख, वय 20 वर्ष, रा. लालपेठ कॉलरी नं.01, चंद्रपुर यांस पुढिल कायदेशीर कार्यवाही करिता पोलीस स्टेशन रामनगर यांच्या ताब्यात देण्यात आले.
सदरची यशस्वी कामगीरी मा. पोलीस अधिक्षक चंद्रपूर, मा. अप्पर पोलीस अधिक्षक, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पो.नि. महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, यांचे नेतृत्वात सपोनि हर्षल एकरे, पोउपनि विनोद भुरले, पोहता संजय आतकलवार, नापोअ संतोष येलपुलवार, पो.अ, गोपाल आतकुलवार यांनी केली.
0 comments:
Post a Comment