Ads

गारपिटीमुळे शेतपिकाचे नुकसान,तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना 25 हजार प्रति हेक्टर मदत जाहीर करा

वरोरा तालुका प्रतिनिधी जावेद शेख - भद्रावती तालुक्यात गेल्या 2 दिवसामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने शेतमालाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. त्यामुळे सदर नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये मदत जाहीर करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना पदाधिकारी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
Damage to crops due to hailstorm, announce 25,000 per hectare aid to farmers immediately by Panchnama
वरोरा - भद्रावती तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात झाले आहे. याआधी नुकसान झालेल्या शेतमालाची देखील नुकसानीची मदत अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाही.यावर आणखी भर पडली असून गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये मदत जाहीर करण्यात यावी व मागे झालेल्या पिकांचे नुकसानीच्या पिकविम्याची रकम सर्व पिडीत शेतकर्यांना लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे या मागणीला घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या मार्गदर्शनात निवेदन देण्यात आले.यावेळी शहर प्रमुख संदीप मेश्राम, जेष्ठ शिवसैनिक तथा शिवदूत बंडू डाखरे, जेष्ठ शिवसैनिक अनिल गाडगे, उपशहर प्रमुख मनीष दोहतरे, युवासेना विधानसभा समन्वयक निखिल मांडवकर, सचिन चीडे व आदी शिवसैनिक उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment