(प्रशांत गेडाम)सिंदेवाही - तहसिल कार्यालय सिंदेवाही सभागृहात संजय गांधी निराधार योजना समितीची मासिक सभा दि 15/02/2024 रोजी पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी कमलाकर सिद्धमशेट्टीवार हे होते.
47 applications approved in Tehsil Office Sindewahi Yethil Sanjay Gandhi Disadhar Committee meeting
सभेमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे 15 अर्ज, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेचे 3 अर्ज, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे 16 अर्ज, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे 13 अर्ज असे एकूण 47 अर्ज मंजूर करण्यात आले. यावेळी सिंदेवाही तहसीलदार संदीप पानमंद, मंगेश तुमराम नायब तहसीलदार, प्रविण गावंडे, हेमंत तेलंग, श्रीमती कटकमवार अव्वल कारकून, श्रीमती रामटेके महसूल सहाय्यक, संजय गांधी योजना समितीचे सदस्य मुरलीधर मडावी, छाया हाडगे, किशोर भरडकर, प्रेमकुमार डेंगे, अरुण सहारे, नत्थु मेश्राम, देवराव कोठेवार, व तुळशीराम गायकवाड हे उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment