Ads

सोळा वर्षांनी आले श्रीकृष्ण अध्यापक प्रशिक्षण विद्यालय सावनेर येथील विद्यार्थी सहपरिवार एकत्र.

राजुरा :-श्रीकृष्ण अध्यापक प्रशिक्षण विद्यालय सावनेर जिल्हा नागपूर येथील सत्र २००५-२००८ मधील माजी विद्यार्थ्यांनी मिळून सावनेर येथे माजी विद्यार्थी स्नेहमीलन व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले होते. तब्बल सोळा वर्षांनी हे सर्व विद्यार्थी सहपरिवार एकत्रित आल्याने अतिशय आनंदाचे वातावरण होते.
After sixteen years, the students and families of Sri Krishna Teacher Training School Savner came together.
या कार्यक्रमाला सत्कारमुर्ती तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विजयराव गणोरकर, प्राचार्य, श्रीकृष्ण अध्यापक प्रशिक्षण विद्यालय, सावनेर यांची उपस्थिती होती. तसेच सत्कारमूर्ती तथा विशेष अतिथी म्हणून नारायण पांडे ,सेवा निवृत्त शिक्षक, निता कुंभारकर -दखणे, अर्चना संगेकर -कोल्हे, अनंता श्रोते , विनोदराव जुनघरे, प्रभाकरराव महाजन, दिलीपराव घुगल, दर्शना ठाकरे -राऊत, हेमलता कडू -चोपडे, निशिगंधा दुरुगकर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बादल नीलकंठ बेले यांनी केले तर सुत्रसंचालन गणेश आटोने यांनी व आभार नितीन खटाळे यांनी मानले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे व वृक्षपूजन करण्यात आले. सत्र २००५-२००८ च्या डी.एड. तुकडीतील स्वर्गीय मिथुन सत्रमवार,शीतल चिमोटे, पुष्पा बोढे यांना दोन मिनिटं मौन धारण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व सत्कारमूर्ती यांना शॉल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वेगवेगळ्या जिल्ह्यातुन आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच डी. एड. करूनही शिक्षकी पेशातील नोकरी न लागल्यामुळे खचून न जाता विविध क्षेत्रात नोकऱ्या मिळालेल्या माजी विद्यार्थीनी उपस्थितांना आपले अनुभव सांगितले. डीएड. होऊनही पोलीस, वनविभाग, स्वयंरोजगार, बँक, शेती, महसूल विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय अश्या विविध क्षेत्रात या विद्यार्थ्यांनी नोकरी स्वीकारत आपले नावलौकिक केले आहे. उपस्थित सर्वच माजी विद्यार्थीना आदासा येथील गणेश मूर्तीच्या फोटोप्रेम व भेटवस्तू देण्यात आल्या. सत्कारमूर्ती यांनीही आपले विचार व्यक्त करीत कुठल्याही कठीण परिस्थितीत स्वतः ला सिद्ध करत मिळालेल्या ज्ञानाचे उपयोजन करावे व खचून न जाता मिळेल ते कामं प्रामाणिकपणे करून स्वतः ची प्रगती साधावी असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना विजय गणोरकर यांनी या तुकडीतील विद्यार्थ्यांच्या कार्याची स्तुती करीत कार्यक्रमा विषयी समाधान व्यक्त केले.यावेळी माजी विद्यार्थ्यांनी परिसरातील आदासा, धापेवाळा,केळवद आदी धार्मिक पर्यटन क्षेत्राना भेटी दिल्या.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment