Ads

मुलाने आई-वडिलांवर केला कुऱ्हाडीने हल्ला, आई जागीच ठार, वडील गंभीर

कोरपना :-कोरपना तालुक्यातील लोणी येथील एका मुलाने आपल्या वयोवृद्ध आई वडिलाला एका खोलीत बंद करून कुऱ्हाडीने वार केल्याची घटना आज 21 फेब्रुवारी रोजी दुपारी अंदाजे 2 च्या सुमारास घडली आहे. यामध्ये आईचा जागीच मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी आहे.उपचारासाठी वडीलाला कोरपना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती चिंताजनक आहे.सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून घटनेनंतर फरार आरोपीला अटक करण्यात आल्याचे कळते
Son attacked parents with axe, mother killed on the spot, father seriously
मनोज पांडूरंग सातपुते वयवर्ष अंदाजे 45, असे आरोपी मुलाचे नाव असल्याचे कळते. शेतीच्या ठेक्यातून मिळालेल्या पैशातून यांच्यात हा वाद झाला आणि या वादातून सदर घटना घडल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.आरोपी मुलांने एका खोलीत आई आणि वडीलाला बंद केले आणि अत्यंत क्रूरतेने आईच्या डोक्यावर कुऱ्हाडीने 4 आणि हातावर 2 वार करून आईला जागीच ठार केला तर वडीलाच्या डोक्यावर 2 वार करून त्याला गंभीर जखमी करून वहीनीच्या मागे धावला, मात्र ती एका खोलीत लपवून अंदरून दरवाजा बंद केल्याने तिचा जीव वाचला.घटनेनंतर आरोपी मुलाने तेथुन पळ काढला मात्र पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.आता याप्रकरणी पुढे काय समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment