भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:-भद्रावती तालुक्यातील केपीसीएल कंपनी च्या कान्ट्रॅक्टर कंपनी असलेल्या कर्नाटका एमटा कंपनीमध्ये कामगार अमर कांबळे यांना अल्पसा पगार मिळत होता दरम्यान त्याचे लग्न जुळले होते मात्र तू कंपनी मध्ये काम करतोय तर तुझी पेमेंट स्लिप दाखव असा तगादा मुलीनी मुलाकडे लावल्याने व कंपनी कामगारांना पेमेंट स्लिप देत नसल्याने आता मुलीला कुठली पेमेंट स्लिप दाखवायची असा प्रश्न मुलासमोर राहिला व जर मी पेमेंट स्लिप मिळाली नाही तर लग्न तुटणार त्यामुळे संतापलेल्या अमर कांबळे यांनी कंपनीकडे पेमेंट स्लिप मागितली पण कंपनी ने ती दिली नाही त्यामुळे हतबल झालेल्या अमर कांबळे यांनी राहत्या घरी सुमठाणा येथे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
अमर कांबळे याला चार बहिणी असून आई विधवा आहे दरम्यान त्यांनी आत्महत्या केल्याने संपूर्ण परिवार दुःखात आहे, अशातच केपीसीएल व कर्नाटका एमटा या कंपनी ने कामगारांना किमान वेतन दिले नाही व कामगारांना पेमेंट स्लिप मिळत नाही त्यामुळे अमर कांबळे यांच्या आत्महत्तेला कंपनी जबाबदार असल्याने कंपनी व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मृत कुटुंबाला 20 लाख रुपये मोबदला देण्यात यावा व परिवारातील सदस्यांना नौकरी देण्यात यावी अशी मागणी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी परिवारासोबत चर्चा करून कंपनीकडे केली आहे जर कंपनी प्रशासनाने परिवाराची मागणी मान्य केली नाही तर परिवाराकडून मृतदेह कंपनी परिसरात ठेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
0 comments:
Post a Comment