भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:-भद्रावती येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजरी वेकोली क्षेत्राचे इंटक अध्यक्ष तथा शहरातील प्रियदर्शनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे संचालक धनंजय गुंडावार यांची काँग्रेस कमिटीच्या जिल्हा महासचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष धोटे यांनी एका पत्राद्वारे ही नियुक्ती केली. Appointment of Dhananjay Gundawar as General Secretary of District Congress Committee.
धनंजय गुंडावार हे अनेक वर्षांपासून काँग्रेसचे नेते असून याआधी त्यांनी पक्षाची विविध पदे भूषवली आहे. त्यांना राजकारणाचा दांडगा अनुभव आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा काँग्रेस पक्षाला होऊन त्यांच्या या नियुक्तीमुळे जिल्ह्यात आधीच मजबूत असलेले कांग्रेसचे संघटन आणखी मजबूत होईल असा विश्वास जिल्हापक्षश्रेष्ठींकडून व्यक्त करण्यात आला. महासचिव पदावर नियुक्ती केल्याबद्दल धनंजय गुंडावर यांनी जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर व वेकोली इंटकचे महासचिव के.के. सिंह यांचे आभार मानले आहे. त्यांच्या नियुक्ती बद्दल शहरात त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
0 comments:
Post a Comment