राजुरा २४ फेब्रुवारी :-विजयाचा सातबारा हा कवी, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते मुकेश वाळके यांनी संपादित केलेला विजयराव टोंगे यांच्या जिवनसंघर्षाचा संक्षिप्त इतिहास अतिशय ताकदीने उभारण्यात येणारा ग्रंथ आहे. एखाद्या व्यक्तीने कायमच समाजाचे भले चिंतिले असेल आणि त्यासाठी आपल्या क्षमतेने वेळोवेळी आपली काया झीजवली असेल तर ती व्यक्ती नक्कीच वंदनीय ठरते मात्र त्याहून वंदनीय ठरते ती त्या व्यक्तीची विचारधारा. हा प्रबोधनपर गौरवग्रंथ समाजासाठी, वाचकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.The publication ceremony of the Gaurav Granth on the Enlightenment of Vijayacha Sathbara.
या प्रकाशन सोहळ्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुधाकरराव अडबाले, शिक्षक आमदार हे उपस्थित राहणार आहेत. तर सत्कारमूर्ती विजय टोंगे, प्रमुख अतिथी म्हणून व्ही. यु. डायगव्हाणे, माजी शिक्षक आमदार, तसेच भा.ग्रा.शी.प्र.मं.चे अध्यक्ष चुन्नीलालभाई चव्हाण, उपाध्यक्ष ऍड. वामनराव लोहे, सचिव केशवराव जेणेकर, सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. इसादास भडके आदींची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. हा प्रकाशन सोहळा भवानजीभाई हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, मूल रोड, चंद्रपूर येथे रविवार दि.२५ फेब्रुवारी २०२४ ला दुपारी १२ वाजता संपन्न होणार आहे.या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक टोंगे मित्रपरिवार चंद्रपूर यांनी केले आहे. "विजयाचा सातबारा" हे गौरवग्रंथाचे शिर्षकच बोलके व आशयसंपन्न आहे. या ग्रंथाला टोंगे सरांच्या कुटुंबाचा "विजयाचा सातबारा" जोडून एक अभिनव प्रयोग करण्यात आला आहे. तो स्तुत्य आणि अभिनंदनीय आहे.
0 comments:
Post a Comment