वरोरा (जावेद शेख ):-पोलीस स्टेशन वरोरा येथे दि. ०१/०३/२४ रोजी गोपनीय माहीतीगार याचेकडुन माहीती मिळाली की, टेमुर्डा गावामागील झुडपी परीसरात सटटापटटीचे आकडयावर पैसे घेवुन हारजीतचा सटटापटटी जुगार खेळ खेळवीत आहे. या माहीतीचे आधारे पोलीस स्टेशन वरोरा येथील पोलीस स्टॉप यांनी सापळा रचुन ११ मोटारसाईकल, आरोपीतांचे मोबाईल, नगदी रोख २५,०००/रू असा एकुन ४,४८,३३५/- रू चा मुददेमाल जप्त करूण एकुन १५ आरोपीतांवर कार्यवाही केली.
सदरची कारवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, मा. सहा पोलीस अधिक्षक नाओमी साटम उप विभागीय पोलीस अधिकारी वरोरा , पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे मार्गदर्शनात सपोनि योगेद्रसिंग यादव, पोहवा दिलीप सुर, नापोअं मोहन निशाद, पोअं. शशांक बदामवार, फुलचंद लोधी यांनी पार पाडली.
0 comments:
Post a Comment